Dead Amar Bandekar Dainik Gomantak
गोवा

Arambol Murder Case: हरमल खून प्रकरण! हिमाचल प्रदेशच्या दोघांना अटक

Amar Bandekar Murder Case: किनाऱ्यावर अडथळा ठरणाऱ्या खुर्च्या हटवल्या म्हणून अमरला शॅकच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.

Pramod Yadav

मांद्रे: हरमल समुद्रकिनाऱी शॅक कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अमर बांदेकर या स्थानिक युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकाला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. हिमाचल प्रदेशच्या असणाऱ्या दोघांना याप्रकरणात अटक करण्यात आलीय.

ललीत नेपाळ ठाकूर (२४) आणि विभीशान कुमार गोपालदास (२६) (दोघेही रा. हरमल, मूळ हिमाचल प्रदेश) असे मांद्रे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही अमरला मारहाण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

यापूर्वी मांद्रे पोलिसांनी याप्रकरणात एकाला अटक करुन १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या एकाला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आलीय.

हरमल समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेला असता किनाऱ्यावर अडथळा ठरणाऱ्या खुर्च्या हटवल्या म्हणून अमरला शॅकच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अमरला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. अमरच्या खूनामुळे राज्यात गोमंतकीय देखील सुरक्षित नसल्याचे मत स्थानिक आणि राजकीय नेते मांडत आहेत.

दरम्यान, गोव्यात एक महिन्याच्या कालावधीत शॅकवर दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी कळंगुट येथे शॅकवर आंध्रप्रदेशच्या बोल्लारवि तेजा यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शॅकचा मालक आणि त्याचा मुलगा व इतर तीन जणांना अटक करण्यात आली. जेवनाच्या ऑडरवरुन झालेल्या वादात या पर्यटकाला मारहाण करण्यात आली यातच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT