Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

Two Minor Girls Killed: साकोर्डा येथे दुचाकीचा स्वयंअपघात होऊन १४ वर्षांच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

धारबांदोडा: साकोर्डा येथे दुचाकीचा स्वयंअपघात होऊन १४ वर्षांच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात १५ वर्षांचा एक मुलगा जखमी झाला आहे. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोर्डा येथील निधी निकेश पाटील (वय १४ वर्षे), राघवी अशोक गावकर (वय १४ वर्षे) आणि एक मुलगा सार्थक परीट (वय १५ वर्षेे) असे तिघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते.

घराजवळच उधळशे येथे एका गाड्यावरील वडा खाऊन ते तिघेजण घरी परतत होते. याचवेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे चालक सार्थक याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात ते तिघेही दुचाकीसह साकवावरून खाली कोसळले.

या अपघातात निधीचा जागीच मृत्यू झाला, तर राघवी गंभीर जखमी झाल्यामुळे तिला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले. निधी ही साकोर्डा हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होती. राघवीही त्याच शाळेत शिक्षण घेत होती.

या घटनेची माहिती मिळताच सभापती गणेश गावकर यांनी हॉस्पिटलला भेट देऊन पीडितांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. निधीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठविला आहे. पोलिस निरीक्षक मेलिटो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप निंबाळकर हे तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Issue: कोमुनिदाद जमिनीवर दोड्डामणींचे नाव; सांत आंद्रेत संताप, वीरेश बोरकर लक्ष्यावर!

Goa Politics: गोव्यात काँग्रेसचा युतीसाठी वेग वाढला; फॉरवर्ड आणि 'आरजी'शी चर्चा करून प्रचार सुरू करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

SCROLL FOR NEXT