Margao Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Fatal Accident: अपघातानंतर दोघेही अर्धातास वाहनात अडकून पडले, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

Margao Fatal Accident: अपघातानंतर पिकअपचे दरवाजे लॉक झाल्याने दोघांना बाहेर काढणे आव्हानात्मक झाले.

Pramod Yadav

Margao Fatal Accident

मडगाव येथील घाऊक मासळी मार्केट येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा पिकअपवरील ताबा सुटल्याने पार्क वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

कुयरो वेळीप (55, मोरपिर्ला) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चालक दीपक गावकर (31, खोतीगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालक दीपकचा पिकअपवरील ताबा सुटल्याने वाहनाने रस्त्यावर पार्क केलेल्या इतर वाहनांना धडक दिली. अपघातानंतर दोघेही सुमारे आर्धातास वाहनातच अडकले होते.

Margao Fatal Accident

पिकअपचे दरवाजे लॉक झाल्याने दोघांना बाहेर काढणे आव्हानात्मक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आल्यानंतर वाहनाचे दरवाजे तोडण्यात आले व दोघांना बाहेर काढण्यात यश आले.

दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, कुयरो याचा मृत्यू झाला तर जखमी दीपक याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातप्रकरणी चालक दीपक विरोधात फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तेच खरे नरकासुर!" विरोधकांच्या एकजुटीवर वीजमंत्री ढवळीकरांचा हल्लाबोल, नरकासुर दहन प्रथा बंद करण्याचीही केली मागणी

Goa Politics: भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी 'एकजुटी'चा फॉर्म्युला, गोव्याच्या राजकारणात नवी खेळी! विरोधकांच्या युतीवर विजय सरदेसाईंचा भर

Goa Financial Reforms: राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा! आणीबाणीचा निधी आता कर्ज फेडणार; सावंत सरकारने 'हमी मोचन निधी'च्या नियमांत केली सुधारणा

FC Goa vs Al Nassr Match: एफसी गोवा-अल नस्सर सामन्याला ‘थंडा’ प्रतिसाद! स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाठ फिरवल्याने प्रेक्षकांनी घरीच पाहिली मॅच

Illegal Construction Controversy: '...तर हिंमत असेल तर दिल्लीवाल्यांची बेकायदा कामं बंद करुन दाखवा', मायकल लोबोंचं मनोज परबांना आव्हान

SCROLL FOR NEXT