Leopard in Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: कोंबड्या खाणारे बिबटे! हरमलमध्ये दोन बिबट्यांकडून 8 दिवसांत 15 कोंबड्या फस्त

Leopard In Goa: गेल्या वर्षभरात नानोस्करवाडा तसेच पार्सेकरवाडा भागात बिबट्यांनी बरीच दहशत निर्माण केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard In Goa

वरचावाडा, इब्रामपूरकरवाडा, हरमल येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, रात्री-अपरात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

या भागात दोन बिबटे मुक्तपणे संचार करीत असून गेल्या आठ दिवसांत त्यांनी ग्रामस्थांच्या १५ कोंबड्या फस्त केल्या आहेत. दावणीला बांधलेली गुरेही या बिबट्यांकडून पळविली जाण्याचा धोका असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

चार दिवसांपूर्वी पुंडलिक इब्रामपूरकर यांच्या घराच्या मागील बाजूस कोंबड्या झाकून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी प्रवेश करून बिबट्यांनी कोंबड्यांचा फडशा पाडला. आतापर्यंत सुमारे १५ कोंबड्या बिबट्यांनी फस्त केल्याचे इब्रामपूरकर यांनी सांगितले.

इतके दिवस कदाचित कोल्हा किंवा मुंगूस कोंबड्या पळवित असावा, असा मला संशय होता. मात्र परवा रात्री मी येथे प्रत्यक्ष बिबट्यांना पाहिले. त्यादिवशी त्या दोन्ही बिबट्यांनी मिळून चार कोंबड्या फस्त केल्या, अशी माहिती इब्रामपूरकर यांनी दिली.

या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून, इब्रामपूरकर यांनी ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे समीर डिचोलकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन खात्याकडे तक्रार करणार असल्याचे इब्रामपूरकर यांनी सांगितले.

वर्षभरात अनेक गुरांचा फडशा

गेल्या वर्षभरात नानोस्करवाडा तसेच पार्सेकरवाडा भागात बिबट्यांनी बरीच दहशत निर्माण केली होती. तोच बिबट्या मांद्रे व अन्य भागांत फिरत होता, असे अनेकांनी सांगितले.

त्या वर्षभरात कुत्रा, वासरू, पाडसे तसेच बैल आदींचा बिबट्याने फडशा पाडला होता. नानोस्करवाडा येथे वन खात्याने पिंजरा लावला होता. मात्र, तो पिंजऱ्यात अडकला नाही. नंतर त्याने पालये परिसरात धूम ठोकली, असे समीर डिचोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT