Crime Dainik Gomantak
गोवा

मडगाव जुने रेल्वेस्थानक परिसर हादरला! दोन मजुरांच्यात जोरदार वाद, दिवसाढवळ्या एकाचा भोसकून खून

Margao Murder: ही घटना सकाळी १०च्या सुमारास घडली; खून केल्यानंतर संशयिताने पळ काढला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime Updates

फातोर्डा: गुन्हेगारी प्रकरणासाठी कुप्रसिद्ध बनलेल्या मडगाव येथील जुने रेल्वे स्थानक परिसरात आज दिवसाढवळ्या ‘राजा’ नामक एका मजुराचा अन्य एका मजुराकडून पोटात चाकू खुपसून खून करण्यात आला. त्यामुळे हा परिसर पुन्हा एकदा हादरून गेला आहे.

ही घटना सकाळी १० वा.च्या सुमारास घडली. खून केल्यानंतर संशयिताने पळ काढला. हा खून भांडणातून झाल्याचे समजते. याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. दरम्यान, काही वर्षांपूर्वी याच परिसरात एका मजुराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.

गुन्हेगारी वाढली!

नवे कोकण रेल्वे स्थानक स्थापन झाल्यानंतर ओल्ड रेल्वे स्थानक परिसर हा मजुरांचे आश्रयस्थान बनला आहे. ही जागा आता गुन्हेगारीचे आगर बनली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांमध्ये अनेकवेळा बाचाबाची होते. यातूनच मारहाण व नंतर खुनाचे प्रकार घडतात, अशी माहिती येथील एका दुकानदाराने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT