Scrapyard
Scrapyard Dainik Gomantak
गोवा

Socorro Panchayat: सुकूरमध्ये दोन बेकायदा भंगारअड्डे जमीनदोस्त; पंचायतीची मोहीम

दैनिक गोमन्तक

Socorro Panchayat: पर्वरी-सुकूर पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर भंगार अड्डे पाडण्याची सुकूर पंचायतीची मोहीम सरपंच सोनिया पेडणेकर यांच्या देखरेखीखाली आज राबवण्यात आली. यावेळी दोन बेकायदा भंगार अड्डे जमीनदोस्त करण्यात आले.

सरपंच सोनिया पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भंगार अड्डामालकांना यापूर्वी अनेक वेळा हे अड्डे हटवण्यासाठी सांगितले होते. 28 डिसेंबर रोजी शेवटची नोटीस दिली होती. त्यानंतरही त्यांनी आपले साहित्य आणि उभारलेले शेड न हटवल्याने पंचायतीने आज हे अनधिकृत शेड तोडले आणि साहित्यही हटवले.

सुकूर पंचायत क्षेत्रात एकूण चार अड्डे होते. नोटीस मिळाल्यावर त्यातील दोघांनी साहित्य हटवले आणि दोन भंगार अड्डे आज जमीनदोस्त केले. यापुढे सुकूर पंचायत क्षेत्रात भंगार अड्ड्यांना परवानगी नसेल, असे पेडणेकर यांनी सांगितले.

पंच गौरी वळवईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील भंगार अड्ड्याला यापूर्वी आग लागली, तेव्हा शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. त्यांच्या तक्रारीवर या भंगार अड्डा मालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी सुकूरच्या उपसरपंच माया केणी, पंच सदस्य राजन पार्सेकर आणि सचिवही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Top News: मोदींना लोकोत्सवाचे निमंत्रण, आसगाव घर मोडतोड प्रकरण; राज्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT