Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City Panaji: 'स्मार्ट सिटी'ची डेडलाईन दोन दिवसांवर; रात्री रस्ते अचानक केले बंद, वाहनचालक त्रस्त

Smart City Panaji: काकुलो मॉल जंक्शन वाहतुकीसाठी बंद करून तातडीने कामे सुरू केली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City Panaji

राजधानी पणजीतील 'स्मार्ट सिटी'ची कामे पूर्ण करण्याची डेडलाईन येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्वकल्पना न देता काही रस्ते काल रात्रीच वाहतुकीसाठी अचानक बंद ठेवले गेल्याने वाहनचालकाना मनःस्ताप सहन करावा लागला.

काकुलो मॉल जंक्शनवरील रस्ता आज सकाळपासून अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे ताळगाव, सांतिनेज तसेच करंझाळे येथून या जंक्शनकडे येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली.

गेले दोन महिने ताळगाव तसेच सांतिनेजकडे जाणारा रस्ता सांतिनेज जंक्शनवर बंद ठेवला गेला होता. ताळगावकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

मात्र सांतिनेज रस्ता सार्वजनिक बांधकाम कार्यालयापर्यंतच खुला केलेला आहे. काकुलो मॉल जंक्शन वाहतुकीसाठी बंद करून तातडीने कामे सुरू केली आहेत.

ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न पणजी स्मार्ट सिटी विकास लि. कंपनीचा असला तरी सध्याची कामांची गती पाहता ते अशक्यप्राय असल्याचे दिसून येत आहे.

"दरदिवशी रात्री उशिरापर्यंत स्मार्ट सिटी कामाचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आढावा घेण्यात येत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. उच्च न्यायालयाला दिलेली डेडलाईन पाळण्याचाही प्रयत्न होत आहे. अनेकदा कामावेळी फुटणाऱ्या जलवाहिन्या किंवा मलनि:स्सारणच्या पाईप्समुळे कामाला उशीर होत आहे.पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा सर्व तो प्रयत्न आहे," असे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिगीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri Upay 2026: वक्री शनि वाढवणार 'या' 5 राशींच्या जातकांची डोकेदुखी, नशिबात मोठा संघर्ष; ताबडतोब करा हे उपाय

Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

AI Human Control: 'एआय'वर हवा मानवी लगाम; तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा जागतिक नियंत्रणाची गरज

संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Lashkar-e-Taiba Commander Killed: दहशतवादाचा फणा ठेचला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर मूसा ठार, भारतीय जवानांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT