Mysterious Death Of Two Brothers In Margoa Goa Due To Starvation Dainik Gomantak
गोवा

Margoa News: पोटात अन्नाचा एकही कण नाही, उपाशी राहिल्यानेच मडगावात सख्ख्या भावांचा मृत्यू

Margoa News: अधिककाळ उपाशी राहिल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

Pramod Yadav

Margoa News

आके येथील पॅराडाइज अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) उघडकीस आली. गूढ ठरलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, दोघांच्या मृत्यूचे कारण समोर आले असून, दोघांच्या पोटात अन्नाचा एकही कण आढळून आलेला नाही. अधिककाळ उपाशी राहिल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

मोहम्मद जुबेर खान (29) आणि अफान खान (27) अशी मृत सख्ख्या भावांची नावे आहेत. तर, त्यांची रुक्साना खान (54) ही देखील अत्यवस्थ स्थितीत आढळून आली होती.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मृत दोघांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तपासणीत दोघांच्या पोटात अन्नाचा एकही कण आढळून आलेला नाही. अनेक दिवस अन्न अथवा पाण्याचे सेवन न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवत मोहम्मद जुबेर व अफान या दोघांचेही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वडील नझीर यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दिवसरात्र धार्मिक उपासना

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांच्या घरात दिवसरात्र धार्मिक उपासना सुरु असायची. यात मोहम्मद जुबेर व अफान यांच्यासह त्यांची आई रुक्साना देखील सक्रिय होती.

जुबेर व अफान यांनी काही दिवसांपासून अन्नपाणी त्याग केल्याचे समजते. दरम्यान, यामागे कोणते कारण होते याबाबत खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT