Illegal Hill Cutting In Goa Dainik Gomantak
गोवा

झाडांची बेसुमार कत्तल करुन डोंगरकापणी; धारबांदोड्यात तिसरी घटना उघडकीस, दोघांवर गुन्हा

Illegal Hill Cutting In Goa: धारबांदोडा जंक्शन येथेही डोंगरकापणी करून रस्ता तयार केला आहे, तसेच जमीन सपाट करून प्लॉटही तयार केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

धारबांदोडा: पंचायत क्षेत्रातील बेतुल- प्रतापनगर आणि धुलैय येथील डोंगर कापणी प्रकरणाच्या पाठोपाठ धारबांदोडा जंक्शन येथे असलेल्या डोंगरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी, तसेच झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे.

'गोमन्तक टीव्ही'ने या प्रकाराची पोलखोल केल्यानंतर आता सरकारी यंत्रणा कामाला लागली असून दोन ठिकाणच्या जमीनमालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

धारबांदोडा जंक्शन येथेही डोंगरकापणी करून रस्ता तयार केला आहे, तसेच जमीन सपाट करून प्लॉटही तयार केले आहेत. अनेकांनी येथील प्लॉट घेतले आहेत. काहींनी तेथे घर बांधण्यासाठी चिरे आणून टाकले आहेत. बाजूला घनदाट जंगल असूनसुद्धा या ठिकाणी प्लॉट खरेदी करताना कोणीही कचरत नाही.

या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर धारबांदोडा तालुक्याची प्रशासकीय इमारत आहे. तेथे सर्व खात्यांची कार्यालये आहेत, तसेच वन खात्याचेही कार्यालय आहे. तरीसुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची जराशीही चाहुल लागू नये, याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जमीनमालकांवर गुन्हा

धारबांदोडा बेतुल-प्रतापनगर व धुलैय या ठिकाणी दोन्ही जमीनमालकांवर कारवाई करणार असून बेतुल प्रतापनगर येथील समीर आनंद वाचासुंदर आणि धुलैय येथील मनोहर घनःश्याम गावकर यांच्यावर भरारी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

तसेच जे कोणी या ठिकाणी प्लॉट घेतले आहेत आणि कागदपत्रात काही त्रुटी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी सांगितले.

चौकशी सुरु

कुळे वन खात्याचे अधिकारी रवी शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी गोपाळ जल्मी यांनी धुलैय येथे जाऊन किती झाडांची कत्तल झाली, तसेच किती झाडे उन्मळून पडली, याविषयी बुधवारी मोजमाप करून पंचनामा केला.

खरेदीदारांचे धाबे दणाणले!

धुलैय, बेतुल प्रतापनगर तसेच धारबांदोडा जंक्शन या ठिकाणी कोणी जमीन खरेदी केली आहे, त्यांची सध्या धावपळ सुरू झाली आहे. जमीन खरेदीदारांना अनेकांकडून दूरध्वनी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

धुलैय येथील एका मंत्र्याच्या समर्थकांनी जमीन सपाटीकरण केल्याची माहिती मिळाली आहे. भरारी पथकांनी छापे टाकल्यानंतर या ठिकाणचे प्लॉट करून जमीन विकणाऱ्या व्यक्तीने एका मंत्र्याकडे धाव घेतली असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

SCROLL FOR NEXT