Arrest|Jail|Crime Canva
गोवा

खरेदीच्या बहाण्याने येऊन लाखोंचे दागिने लंपास केलेल्या 'त्या' जोडप्याला पणजीत अटक; दोन दिवसांपासून चालू होता शोध

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Theft News

पणजी: पणजीतील तनिष्क शोरूममध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने येऊन हातोहात सुमारे १ लाखांचे दागिने लंपास करून पळ काढलेल्या एका महिलेसह दोघांना पणजी पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयित चिराग पलरीवाला व निक्की शर्मा याचा शोध घेतला. दोघांकडून चोरलेला माल जप्त केला आहे. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० सप्टेंबर रोजी दुपारी २.२५ वा. सुमारास एक जोडपे तनिष्क शोरूमध्ये आले. त्यांनी सोनसाखळी व इतर काही सोन्याचे दागिने दाखवण्यात सांगितले. या शोरूममधील कर्मचाऱ्यांनी त्यांनी डिस्प्ले ट्रेमध्ये काही दागिने ठेवून त्याची माहिती देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या कर्मचाऱ्याचे लक्ष विचलित करून सोनसाखळी व ३.९१ ग्रॅम किंमतीचे दागिने मिळून तेथून पसार झाले. या कर्मचाऱ्याने दागिने पुन्हा ठेवताना त्यातील काही दागिने गायब असल्याचे लक्षात आले. शोरूममधील सीसी टीव्ही कॅमेरामध्ये या जोडप्याने दागिने चोरल्याचे उघड झाले. याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक शलाभ निमा यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांत तक्रार दाखल होताच या संशयितांची छायाचित्रे तसेच त्याची माहिती राज्यातील सर्व पोलिस स्थानकामध्ये पाठवण्यात आली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून संशयितांचा शोध घेण्यात येत होता. हे जोडपे पणजीतच राहत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. त्याना पणजीतच अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतली असता चोरलेल्या वस्तू त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. संशयित चिराग हा पश्‍चिम बंगालमधील तर संशयित निक्की शर्मा ही उत्तरप्रदेश येथील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

Mhadei River Dispute: कर्नाटकाने असं पळवलं पाणी, गोव्यातील वकिलांची फौज करते काय?

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

SCROLL FOR NEXT