Rented cars Dainik Gomantak
गोवा

Goa Rent a Car: कळंगुट येथे खासगी गाड्या परदेशी पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या दोघांना अटक

वाहन मालकांवर पोलिसांची कारवाई; महिंद्रा थर, यामाहा फासिनो जप्त

Akshay Nirmale

Goa Rent a Car: गोव्यातील सुप्रसिद्ध कळंगुट येथे परदेशी पर्यटकांना रेंट ऑन कार या सेवेत खासगी गाड्या देणाऱ्या दोघा वाहनमालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या वाहनमालकांच्या महिंद्रा थर (GA-07-L-9874) आणि यामाहा फासिनो (GA-03-AN-0785) या दोन गाड्याही जप्त केल्या आहेत.

वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. अल्पवयीन चालकाच्या पालकांवरच थेट कारवाई केली जाणार आहे. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या वाहनमालकावर कारवाई होणार आहे. याशिवाय नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांनाच कार किंवा बाईक भाडेतत्वावर देता येणार आहेत. मात्र खासगी वाहने पर्यटकांना भाड्याने दिल्यास, वाहनमालकावर कारवाई करण्याची तसेच ही वाहने कायमस्वरूपी जप्त करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिला होता.

गोवा ही भारताची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच देशासह जगभरातून पर्यटकांचा ओढा गोव्याकडे असतो. या पर्यटकांना गोवा भ्रमंती सोयीची व्हावी म्हणून येथे रेंट ऑन कार आणि रेंट ऑन बाईक या सेवा येथे व्यावसायिकांकडून दिल्या जातात. तथापि, या सेवा देताना काही नियम पाळावे लागतात. उदाहरणार्थ अशा सेवेमध्ये दिल्या जाणाऱ्या कार किंवा बाईक यांना पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. त्यावरून या गाड्या या सेवेतील आहेत, हे ओळखता येते.

तथापि, काही व्यावसायिक जेव्हा त्यांच्याकडील रेंट वर देण्याच्या गाड्या संपतात किंवा काही पर्यटकांची गरज म्हणूनही हे व्यावसायिक खासगी गाड्या देतात. पण ते नियमाला धरून नाही. शिवाय नोंदणी असणाऱ्यांना हा व्यवसाय करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुलगाममधील CRPF पथकावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी चकमकीत ढेर

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

SCROLL FOR NEXT