Two arrested by Porvorim Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: कोल्हापूरातील युवकांची गोव्यातील वाईन शॉपमध्ये चोरी; दोघांना अटक

Rajat Sawant

Porvorim Police Arrest Wine Shop Thives: पर्वरी पोलिसांनी बेती येथील एका वाईन शॉपमधून मद्याच्या बाटल्यांची चोरी केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील (Maharashtra) दोघांना अटक केली आहे.

दोघेही संशयित कोल्हापूर (Two accused From Kolhapur) येथील असून त्यांनी 22 हजार रुपयांच्या विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या लंपास केल्या होत्या.

संशयितांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पर्वरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेती येथील आपल्या वाईन शॉपमध्ये चोरी झाल्याची तक्रार वाईन शॉप मालकाने पर्वरी पोलिसांत दाखल केली होती. काही अज्ञात व्यक्तींनी बेती येथील वाईन शॉपचे शटर तोडून शॉपमधील 22 हजार रुपयांच्या विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या ( liquor bottles of various brands ) चोरल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते.

तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. संशयितांनी पांढऱ्या रंगाच्या कारचा वापर करुन हा गुन्हा केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. संशयित महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे तपासात समोर आले. कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने पर्वरी पोलिसांच्या पथकाने संशयितांना गांधीनगर, कोल्हापूर येथून ताब्यात घेतले.

समीर बाबू नदाफ (27) व मुस्तकीम इनामदार (22) दोघेही रा. गांधीनगर, कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसडीपीओ पर्वरी विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अनंत गावकर, पीएसआय सीताराम मलिक, पीएसआय प्रतीक भाटप्रभू, हेड कॉन्स्टेबल सुभाष गवस, विवेक तोरस्कर, कॉन्स्टेबल नितेश गावडे, महादेव नाईक, भिकाजी परब, तुषार राऊत यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT