Two accused arrested in Madhya Pradesh murder case in Goa
Two accused arrested in Madhya Pradesh murder case in Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा गुन्हेगारांचे आश्रयस्थान! मध्यप्रदेश खूनप्रकरणी दोघांना अटक

दैनिक गोमन्तक

पणजी: भोपाळ (MP) येथे खून करून फरारी असलेले संशयित हसिम कुरेशी ऊर्फ पप्पू चातका (30) व दुर्गेश रावत ऊर्फ दुग्गा (24) या दोघांना मध्यप्रदेश पोलिसांनी गोवा क्राईम ब्रँच (Goa Crime Branch) पोलिसांच्या मदतीने साळगाव येथून अटक केली. संशयित कुरेशी याच्याविरोधात मध्यप्रदेशमध्ये 22 गुन्हे नोंद आहेत. तेथील सरकारने त्याच्यावर 30 हजारांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

मध्यप्रदेशमधील खूनप्रकरणातील संशयित गोव्यात आश्रय घेऊन असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. ते दोघे बार्देश तालुक्यातील परिसरात राहत असल्याचे मोबाईल लोकेशनवरून स्‍पष्‍ट झाले होते. त्‍यावरून गोवा क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर आणि त्यांच्या पथकाने संशयितांची माहिती गुप्तचर पोलिसांच्या मदतीने जमा केली. त्यानंतर या दोन्ही संशयितांवर पाळत ठेवून मध्य प्रदेश पोलिसांना माहिती देण्यात आली. या संशयितांविरुद्ध भोपाळ येथील तात्या टोपे नगर पोलिस स्थानकात कलम 302, 323, 294, 148 व 149 खाली गुन्हा नोंद आहे. संशयित हसिम याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारहण, शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही ताब्यात घेऊन मध्य प्रदेश पोलिस आज रवाना झाले.

गोवा गुन्हेगारांचे आश्रयस्थान!

गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असले तरी ते आता गुन्हेगारांसाठी आश्रयाचे ठिकाण बनत आहे. देशातील इतर राज्यांतून गुन्हे करून लपण्यासाठी गोवा हे ठिकाण गुन्हेगार पसंत करत असल्याचे अशा घटनांवरून स्‍पष्‍ट होते. राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यावर पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही गुन्हेगारांचा शोध घेण्यास अपयशी ठरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT