पिसुर्ले: फोंडा (Ponda) होंडा मार्ग दरम्यान होंडा तिस्क येथील शेटये बार समोरील रस्त्यावर एका मालवाहू कंटेनरच्या वरच्या भागाला विज केबल्स (power cables) अडकल्याने तेथेअसलेला विज खांब चालत्या कंटेनर कलंडून अपघात घडला, यामुळे या भागातील विज पुरवठा खंडित होता दरम्यान वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली.
या संबंधी सविस्तर वृत्त असे की कुंकळी औद्योगिक वसाहतीमधून होंडा औद्योगिक वसाहती मधील एका कंपनीतील मालाची वाहतूक करणाऱ्या कंटेनर रजिस्टर क्रमांक GA06T-3614 होंडा तिस्क येथिल शेटये बार जवळ पोचताच रस्त्याच्या वरून गेलेल्या विज केबल्स व इतर तारा कंटेनरच्या वरच्या भागात अडकल्याने तेथे असलेला विज खांब सदर कंटेनर वर कलंडला, त्यामुळे या भागात काही काळ वीज पुरवठा खंडित झाला तर दोन्ही बाजूंनी वाहतूकीचा खोळंबा झाला, मात्र सदर घटना घडताच वीज पुरवठा खंडीत झाल्याने कोणतीच प्राणहानी किंवा वाहनांची नुकसान झाली नाही, तर यामुळे विज खात्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे होंडा तसेच पिसुर्ले परीसरात मिळून दोन औद्योगिक वसाहती असल्याने या भागात बऱ्याच अवजड वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामुळे रस्त्याच्या आरपार गेलेल्या वीज केबल्स व तारा अशा प्रकारे लोंबकळत असल्याचे प्रकरण ऐरणीवर आले आहे, सदर घटनेची दखल घेऊन वीज खात्याने या भागातील वीज केबल्स व तारांवर लक्ष घालून सदर प्रकाराची घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना आखावी अशी मागणी होंडा परीसरातील नागरिकांनी केली आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.