Lavoo Mamledar Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar Death Case: लवू मामलेदार मृत्यू प्रकरणाचा तिढा वाढला; शवचिकित्सा अहवालातून महत्वाची माहिती उघड

Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case: शवचिकित्सा अहवालानुसार, मामलेदार यांच्या शरीराच्या मागे काळे डाग आढळून आले आहेत.

Pramod Yadav

फोंडा: माजी आमदार लवू मामलेदार यांचा शनिवारी बेळगावात मृत्यू झाला. कॅब चालकाशी झालेल्या किरकोळ वादातून त्यांना मारहाण झाली. आणि लॉजमध्ये जाताना मामलेदार कोसळले. लवू यांचा शवचिकित्सा अहवाल समोर आला असून, या अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचा तिढा आणखी वाढला आहे.

लवू मामलेदार यांच्या समोर आलेल्या शवचिकित्सा अहवालानुसार, मामलेदार यांच्या शरीराच्या मागे काळे डाग आहेत. त्यांच्या शरीरावर इतर कोणत्याही मोठ्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. अहवालातून मामलेदार यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, रासायनिक विश्लेषण आणि हिस्टोपॅथोलॉजी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

लवू मामलेदार बेळगावात गेले असता खडेबाझार परिसरात त्यांची कार एका रिक्षा तथा कॅब चालकाला धडकली. लवू यांनी माफी देखील मागितली पण, संतापलेल्या रिक्षा चालकाने लॉज परिसरात जात मामलेदार यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. यानंतर लॉजमध्ये गेलेले मामलेदार रिसेप्शनजवळ कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बेळगाव पोलिसांनी याप्रकरणी अमिर सुहेल सनदी या रिक्षा तथा कॅब चालकाला खुनाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सनदीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शवचिकित्सा अहवालातून समोर आलेल्या माहितीमुळे मामलेदार मृत्यू प्रकरणाचा तिढा वाढला आहे. व्हिसेरा अहवालातून आणखी खुलासा होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT