टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या आघाडीच्या दुचाकी व तीनचाकी वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जागतिक वाहन उत्पादक कंपनीने बुधवारी गोव्यात नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० ही स्कूटर लाँच केली. या स्कूटरमध्ये अत्याधुनिक इंजिनसह अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्कूटरमध्ये स्टाइल, मायलेज, कामगिरी, आरामदायीपणा, सोईस्करपणा, सुरक्षा आणि तंत्रज्ञान अशा सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे. सहा आकर्षक रंगांत ही स्कूटर उपलब्ध करण्यात आली आहे.
लाँचप्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीच्या कम्युटर बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रँड व मीडिया विभागाचे प्रमुख अनिरुद्ध हलदार उपस्थित होते. हलदार यांनी यावेळी सांगितले की, टीव्हीएस ज्युपिटर ११० गेल्या दशकभरापासून टीव्हीएस मोटर स्कूटर उत्पादन श्रेणीचा आधारस्तंभ आहे.
आतापर्यंत ६.५ दशलक्ष ग्राहकांनी या उत्पादनावर आपला विश्वास दाखवत तिला भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह ब्रँड्समध्ये स्थान मिळवून दिले आहे. जादा का फायदा हे तत्त्व नव्याने डिझाइन करण्यात आलेल्या टीव्हीएस ज्युपिटरमध्ये पुरेपूर वापरण्यात आले आहे. गरजेनुसार टॉर्क देण्याची क्षमता, सुधारित इंधन क्षमता, वापरण्यासाठी भरपूर जागा, आकर्षक डिझाइन, यामुळे ही स्कूटर वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.
नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० ला ११३.३ सीसी, सिंगल सिलिंडर, ४ स्ट्रोक इंजिन असून, ते ५.९ केडब्ल्यू@६५०० आरपीएम आणि ९.८ Nm@ ५००० आरपीएम (आयजीओ असिस्टसह) आणि ९.२ Nm @ ५००० आरपीएम (असिस्टशिवाय) ऊर्जा निर्मिती करते.
कंपनीच्या आधीच्या उत्पादनांच्या तुलनेत या स्कूटरच्या मायलेजमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच इंटेलिजंट इग्निशन सिस्टिम, ऑटो स्टार्ट-स्टॉप फंक्शनॅलिटी आणि आयएसजी (इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर) यांचा समावेश करण्यात आला आहे.
दुहेरी हेल्मेट स्टोअरेज, मेटल मॅक्स बॉडी, फॉलो मी हेडलॅम्प्स, टर्न सिग्नल लॅम्प रेस्ट, इमर्जन्सी ब्रेक वॉर्निंग आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या स्कूटरची किंमत रु. ७८,००० (एक्स शोरूम गोवा,) असून, ही स्कूटर ड्रम, ड्रम अलॉय, ड्रम एसएक्ससी आणि डिस्क एसएक्ससी या चार व्हेरिएंट्समध्ये टीव्हीएसएम वितरकांकडे उपलब्ध करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.