Jay Bhanushali  Dainik Gomantak
गोवा

Goa - Mumbai फ्लाईट लेट झाली अभिनेता जय भानुशाली विमान कंपनीला म्हणाला, 'गेट वेल सून'

बिग बॉस 15 फेम जय भानुशालीने एअरलाइन कंपनीच्या सेवेबद्दल निराशा व्यक्त केली.

Pramod Yadav

Goa - Mumbai Flight: टीव्ही अभिनेता जय भानुशालीने अकासा विमान वाहतूक कंपनीच्या विमानसेवेबाबत टीका केली आहे. गोव्याहून मुंबईला दुपारी 1 वाजताचे विमानाला उशीर झाल्याने जयने संताप व्यक्त केला आहे.

बिग बॉस 15 फेम जय भानुशालीने एअरलाइन कंपनीच्या सेवेबद्दल निराशा व्यक्त केली. कंपनीला जाब विचारत त्याने लवकरात लवकर बरे व्हा असा खोचक टोला देखील लगावला आहे.

'प्रिय AkasaAir तुम्ही लवकर बरे व्हावे हीच इच्छा आहे, कारण गैरव्यवस्थापन हे Akasa airline चे दुसरे नाव आहे. गोवा ते मुंबई जाणारी दुपारी 1 ची फ्लाईट होती पण विमानाला 4 वाजेपर्यंत उशीर झाला. याबाबत कोणताही संदेश किंवा पूर्व सूचना देण्यात आली नाही...तुम्ही एक ग्राहक म्हणून मला गमावले आहे,' असे जयने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, कंपनीने देखील जयने केलेल्या ट्विटला उत्तर दिले आहे. 'नमस्कार जय, तुम्हाला गैरसोय झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमची गोवा-मुंबई QP1395 ही फ्लाइटला खराब हवामानामुळे दिल्लीहून येण्यास उशीर झाला. फ्लाईट विलंबाबाबत आम्ही तुमच्या नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर एसएमएस आणि ईमेल पाठवला आहे,' असे अकासा कंपनीने उत्तर दिले आहे.

जय भानुशाली 15 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्याने कसौटी जिंदगी की, कायमंथ, किस देश में है मेरा दिल आणि अशा अनेक टीव्ही मालिकेत काम केले आहे. सध्या तो 'हम रहे ना रहे हम' या शोमध्ये टीना दत्ताच्या विरोधात मुख्य भूमिका साकारत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: "निष्काळजीपणा महागात पडेल..." सनी पाजींकडून टीम इंडियाला धोक्याचा इशारा, फलंदाजांवर ओढले ताशेरे

Bison Attack: मांद्रेत गव्याचा धुमाकूळ! काजूच्या बागेत कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला, जीएमसीत उपचार सुरू

Team India Controversy: विराटच्या कसोटी निवृत्तीचं 'गंभीर' कनेक्शन? 'RO-KO'ला वनडेतून डच्चू देण्याची तयारी? 'कोल्ड वॉर'वर 'BCCI'चा मोठा खुलासा

NIT Theft Case: एनआयटीत चोरी; फटिच्या प्राध्यापकाक धरलो आंध्रप्रदेशात

Goan Food Culture: 'कापे' म्हटली की ती बटाट्याचीच आणि 'फोडी' म्हटल्यावर त्या बटाटेतर...

SCROLL FOR NEXT