Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Tuyem Hospital: तुये इस्पितळाचे खासगीकरण नको; सरकारने दिशाभूल करू नये असे माजी मुख्यमंत्री पार्सेकरांचे आवाहन

Laxmikant Parsekar: सरकारने जुनी इमारत स्थलांतरण करणे योग्य नसून त्याबाबतीत गोवा मेडिकल कॉलेजचे नियंत्रण असणे आवश्यक असल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Laxmikant Parsekar About Tuyem Hospital

हरमल: सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून सरकारी तिजोरीत जमा होणारा निधी तुये इस्पितळ इमारतीवर खर्च करण्याची गरज होती. रंगरंगोटी दोनवेळा केली म्हणजे काम पूर्ण झाले असे नव्हे, त्यातील ऑपरेशन थिएटर व अन्य विभाग पूर्ण झाल्यानंतर सेवेस उपलब्ध झाल्यास जनतेला फायदा होईल, अन्यथा उपयोग शून्य आहे. आर्थिक मंजुरी मिळाल्याशिवाय कामाचा आदेश दिला जात नाही. त्यामुळे पैशांची तरतूद केली नव्हती म्हणणे योग्य नव्हे. सरकारने दिशाभूल करू नये, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

पेडणेतील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बोलत होते. मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, इलेक्ट्रॉनिक सिटी व पर्यटन स्थळांचे महत्त्व ओळखून आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची योजना होती. मंडुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गोमेकॉशी संलग्न आहे, तसे तुये इस्पितळ करण्याची तयारी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर व आपण आरोग्यमंत्री होतो. त्यानंतर आपण मुख्यमंत्री झालो. मात्र, सर्व सोपस्कार पूर्ण करण्यास वेळ लागला, असेही ते म्हणाले.

तुये इस्पितळ कृती समितीच्या बैठकांना आपण उपस्थित होतो. त्यांचे कार्य तालुक्यातील जनतेला, राज्याला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी आहे व त्यांच्या कार्यास आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, त्यांच्या नित्य बैठकीस उपस्थित राहणे शक्य होत नाही, असेही ते म्हणाले.

सध्याचे सरकार कोणते व काय, काय निर्णय घेईल, याविषयी आपण बोलू इच्छित नाही. मात्र, सरकारने जुनी इमारत स्थलांतरण करणे योग्य नसून त्याबाबतीत गोवा मेडिकल कॉलेजचे नियंत्रण असणे आवश्यक असल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

तुये इस्पितळाचे खासगीकरण नको

तुये इस्पितळाचे खासगीकरण धोकादायक असून ते होऊ नये असे आपले मत आहे. मध्यंतरी दक्षिण गोव्यातील इस्पितळ इमारत देण्याचे प्रयत्न ऐकिवात होते. खासगीकरणाचा प्रयत्न किमान आरोग्यविषयक सुविधांच्या बाबतीत होऊ नये, असे आपले प्रांजल मत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT