Electronic City Dainik Gomantak
गोवा

Electronic City: तुये इलेक्ट्रॉनिक सिटीचे भिजत घोंगडे; 7 वर्षे रखडलाय प्रकल्‍प

Electronic City: तीव्र संताप : सरकारकडून बेरोजगार युवकांची क्रूर चेष्‍टा

दैनिक गोमन्तक

Electronic City: राज्‍य सरकारने तुये इलेक्ट्रॉनिक सिटी व मोपा विमानतळ प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच दिवशी केली होती. विमानतळाचे काम पूर्ण झाले, महसूलप्राप्तीही सुरू झाली. मात्र तुये इलेक्‍ट्रॉनिक सिटीला अजून चालना का मिळाली नाही, असा सवाल स्थानिक बेरोजगार युवकांकडून उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

राजधानी पणजीत वातानुकूलित कार्यालयात बसून पेडणे तालुक्याचा झोनिंग प्लान तयार केलेल्यांना जनतेने सणसणीत चपराक दिली आहे. आतासुद्धा सर्वांनी एकत्र येऊन, मतभेद बाजूला ठेवून इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी म्‍हणजेच बेरोजगार युवकांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. सात वर्षे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावल्यास, त्या क्षणाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, हे निश्‍चित. दरम्‍यान, सदर प्रकल्‍प का रखडून पडलाय, याची निश्‍चित कारणे सरकारने स्‍पष्‍ट करावीत, अशी मागणी राज्‍यातील युवा पिढी करू लागली आहे.

आमचा भ्रमनिरास : इलेक्ट्रॉनिक सिटीमुळे बेरोजगार अभियंता व कुशल हातांना रोजगार मिळणार होता. त्‍यामुळे कित्येक युवकांनी गोवा सोडून जाणे टाळले व आपले भविष्य येथेच करण्याचे नियोजन केले. मात्र नंतर प्रकल्‍प रखडला, असे काही युवकांनी सांगितले. सरकारने आमचा भ्रमनिरास केला आहे. उच्च शिक्षण घेऊनही आम्‍ही अजून बेरोजगार आहोत. सरकार आमच्‍या समस्‍येकडे लक्ष देईल काय, असा सवाल संतप्‍त युवकांनी केला आहे.

पंतप्रधान कार्यालय अनभिज्ञ का? : प्रदीप सरनाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केलेल्या या अद्ययावत प्रकल्पाचा आढावा घेण्याचे कष्ट पंतप्रधान कार्यालय घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. जनतेच्या पैशाने केलेला पायाभरणी सोहळा हा सरकारी थाट होता. सामान्य जनतेच्या पैशांचा असा गैरवापर करणे योग्‍य आहे का? एरवी आधुनिकतेचा डंका पिटणाऱ्या सरकारने आपल्याच प्रकल्पावर उधळपट्टी करून काय साधले आहे? असे खोचक सवाल एक युवक प्रदीप सरनाईक यांनी उपस्‍थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT