Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: ट्रक अडकण्याचा सिलसिला कायम

काही वेळातच हा ट्रक खड्ड्यातून काढण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

स्मार्ट सिटीची कामे एका बाजूला सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला न्यायालयाने रस्त्याची उंची वाढू नये म्हणून डांबरीकरण करताना सुरुवातीचे थर काढून त्यावर डांबरीकरण करण्यास बजावले आहे.

त्यामुळे मळा परिसरातील रस्त्यावरील डांबरीकरणाचा थर काढून त्यावर नव्याने डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना काही ठिकाणची जमीन भुसभुशीत असल्याने त्यावरून अवजड वाहन गेल्यास ते रुतून बसत असल्याचा प्रकार शनिवारी दिसून आला.

फोन्ताइन्हेस (मळा) येथील अरुंद रस्त्यावरील जुने डांबरीकरणाचा थर जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला आहे. त्यावर आता डांबरीकरणाचे काम करत असताना रस्त्याच्या पलिकडे गेलेल्या जलवाहिन्या रस्ता फोडून नेल्या असल्याने हे डांबरीकरण काढताना काही ठिकाणी रस्ता भुसभुशीत झाल्याचे दिसून येते. शनिवारी दुपारी जीए02, टी-5109 हा मालवाहू ट्रकचे ओझ्याने रस्ता खचला. ओझ्यामुळे ट्रकची चालकाच्या मागील बाजूची दोन चाके रस्त्यात खचली.

या मार्गावरील वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू आहे, अवजड वाहनांना बंदी असली तरी रस्त्याचे काम सुरू असतानाही दुचाकींची ये-जा येथून सुरू आहेच. आज दुपारी मालवाहू ट्रक काम चाललेल्या ठिकाणाहून जात असताना ओझामुळे रस्ता खचला आणि ट्रकची मागाली चार चाके खचलेल्या खड्ड्यात अडकली.

त्यामुळे काही वेळातच हा ट्रक खड्ड्यातून काढण्यात आलाही. परंतु या कामाबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. एकतर रात्रीचे डांबरकरण केल्यास असे प्रकार घडले तरी त्याचा त्रास नागरिकांना होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT