Goa mining Dainik Gomantak
गोवा

'खाणी सुरु करताना स्थानिक ट्रकांचा विचार व्हावा'

डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी, सरकारच्या निर्णयाचेही स्वागत

दैनिक गोमन्तक

डिचोली : खाणी सुरु करताना सरकारने अगोदर आमच्या ट्रकांचा विचार करून, आर्थिक संकटातून आम्हाला सावरावे. अशी मागणी डिचोलीतील ट्रकमालकांनी केली आहे. खाणबंदीचा आम्हाला मोठा फटका बसला असून, आर्थिक कमाईचे स्रोतच बंद झाल्याने आम्हाला अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशी खंत उशीर झाला असला, तरी खाण लिजेस रद्द करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे ट्रकमालकांचे म्हणणे आहे.

खाण लिजेस रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आता खाणी सुरु होण्याचे संकेत मिळाल्याने खाण अवलंबितांमध्ये आशेचा किरण पसरला आहे. खनिज वाहतुकीशी संबंधित ट्रकवाल्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. कधी एकदा खाणी सुरु होतात आणि बंदावस्थेतील ट्रक रस्त्यावर उतरावयाला मिळतात. त्याची ट्रकवाल्यांना प्रतीक्षा आहे. सरकारने लवकरात लवकर खाणी सुरु कराव्यात. अशी मागणी ट्रकवाल्यांकडून करण्यात येत आहे.

डिचोलीसह पैरा, शिरगाव, मये आदी भागात मिळून 1 हजारहून अधिक ट्रक तालुक्यातील वेगवेगळ्या खाणींवर खनिजाची वाहतूक करीत होते. एका सेसा खाणीवर तर 300 हून अधिक ट्रक कार्यरत होते. मात्र खाणी बंद झाल्यापासून हे ट्रक धूळखात पडले आहेत. काही ट्रक गंजून गेले आहेत. तर काही ट्रकांवर वेली-झुडूपानी आक्रमण केले आहे. काही ट्रक पुन्हा रस्त्यावर धावण्याच्या लायकीचेही राहिलेले नाहीत.

काम नाहीच उलट खाणी सुरु होणार म्हणून बहूतेक ट्रकवाल्यांनी जवळपास असलेले पैसे खर्चून किंवा कर्ज काढून ट्रकांची दुरुस्ती केली आहे. मात्र कामच नसल्याने ट्रकवाले संकटात अडकले आहेत. त्यात ट्रकवाल्यांसमोर 'ग्रीन टॅक्स'चे संकट उभे ठाकले आहे. ट्रकांना काम नसल्याने ट्रकांची देखभाल कशी करायची आणि घरसंसार कसा चालवायचा, असा प्रश्न ट्रकवाले उपस्थित करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT