Chorla Ghat Truck Accident Fire Incident
वाळपई: चोर्ला घाटातील कर्नाटक सीमेजवळील व्ह्यू पॉइंटवरील रस्त्यावर रविवारी पहाटे एका ट्रकाचा टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दरीत कोसळला. चालकाने वेळीच ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने सुदैवाने तो बचावला. दरीत कोसळलेल्या ट्रकला आग लागल्याने सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक मालक रामू शेळके से मालवाहू ट्रक (जीए-०४-टी-६४८३) हे चोर्ला घाटातील व्ह्यू पॉइंटजवळून जात असता अचानक ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे शेळके यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या बाजूला गेला. यावेळी शेळके यांनी वेळीच ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला, परंतु ट्रक खोल दरीत कोसळला. कोसळल्यानंतर या ट्रकला आग लागली.
वाळपई अग्निशमन दलाच्या या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जवान घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नाने आग विझविली. या आगीत ट्रकचे सुमारे ३० लाखावर नुकसान झाले आहे, तर १० लाखांची मालमत्ता वाचविण्यास जवानाना यश आले. वाळपई अग्निशमन दलाचे सतीश के. नाईक (एलएफएफ), अशोक व्ही. नाईक (डोपट), कालिदास गावकर (एफएफ) आणि गोकुळदास आर. देगवेकर यांच्या पथकाने मदत कार्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.