Truck Drivers aggressive in Surla Dainik Gomantak
गोवा

सुर्लातील ट्रकवाले रस्त्यावर, 'सेसा'ची खनिज वाहतूक रोखली

तारमाथा-सुर्ला येथे कार्यरत असलेल्या सेसा (वेदांता) कंपनीचा बेनेफिशरी प्लांट असून, खनिज मालातील सिल्ड काढण्यासाठी या प्लांटवर ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

स्थानिक ट्रकांना काम द्या. अशी मागणी करत काळ पुन्हा एकदा उतरताना सुर्लातील (Surla)ट्रकवाल्यांनी सेसाची खनिज वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. खनिज वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी कारवाई करताना जवळपास 25 स्थानिक ट्रकवाल्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनकर्त्या ट्रकवाल्यांनी अटक करवून घेतली. दरम्यान, अटक केल्यानंतर ट्रकवाल्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत हे ट्रकवाले पोलिस स्थानकातच होते. अखेर राजी झाल्यानंतर रात्री उशिरा अटकेत असलेल्या ट्रकवाल्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. गेल्या 23 रोजीही या ट्रकवाल्यांनी आंदोलन केले होते.(Truck Drivers aggressive in Surla)

तारमाथा-सुर्ला येथे कार्यरत असलेल्या सेसा (वेदांता) कंपनीचा बेनेफिशरी प्लांट असून, खनिज मालातील सिल्ड काढण्यासाठी या प्लांटवर ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरु आहे. मागणी करूनही खनिज वाहतुकीसाठी स्थानिक ट्रकांना डावलण्यात येत असून, कंपनीकडून डंपर वापरून खनिज वाहतूक करण्यात येत असल्याची स्थानिक ट्रकवाल्यांची तक्रार आहे. ट्रकांना काम मिळत नसल्याने आर्थिक संकटात अडकले असून, ट्रकही धूळ खात पडून आहेत. असे ट्रकवाल्यांचे म्हणणे आहे. ट्रकांना काम मिळावे, यासाठी 'सुर्ला फस्ट' असोसिएशनच्या झेंड्याखाली स्थानिक ट्रकमालक एकवटले आहेत. स्थानिक ट्रकांना काम द्या. अशी मागणी करीत सुर्ला फर्स्ट' चे अध्यक्ष भानुदास सोननाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ट्रकवाले सोमवारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सेसाची वाहतूक रोखून धरली. आंदोलनाची माहिती मिळताच डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकवाले आपल्या मागणीशी ठाम राहिले. अखेर आंदोलनकर्त्या ट्रकवाल्यांना ताब्यात घेऊन डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात आल्यानंतर त्यांना भादंसंच्या 151 कलमाखाली अटक करण्यात आली.

काँग्रेसचे नेते पोलिस स्थानकात

ट्रकवाल्यांना अटक केल्याची माहिती मिळताच, माजी आमदार प्रताप गावस यांच्यासह धर्मेश सगलानी, प्रवीण ब्लेगन, राजेश सावळ, खेमलो सावंत आदी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस स्थानकावर हजर झाले. अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यासाठी त्यांच्या वाटाघाटी सुरु होत्या.

तर प्लांट बंद करा

करासुर्लातील सेसाचा प्लांट बेकायदा असल्याचा दावा आंदोलनकर्त्या ट्रकवाल्यांनी केला आहे. आमच्या ट्रकांना काम मिळत नसेल, तर हा प्लांट बंद करावा. अशी मागणीही या ट्रकवाल्यांनी सुटका होताच पत्रकारांशी संवाद साधताना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT