Truck driver hits height barrier At Khandola Dainik Gomantak
गोवा

Khandola Accident: खांडोळा बगलमार्गावर अपघातात ट्रकचालक ठार; लोखंडी कमानीचेही नुकसान

गवंडाळी-जुनेगोवे मार्गावर अवजड वाहनांना बंदी

दैनिक गोमन्तक

Truck Driver Hits Height Barrier At Khandola: येथील उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७.४५ च्या दरम्यान एका मालवाहू ट्रकने बगलमार्गावरील लोखंडी कमानीला जोरदार धडक दिली. त्या धडकेत ट्रकचालक जागीच ठार झाला. ट्रकचा दर्शनी भाग आणि केबीनचा चक्काचूर झाला.

ट्रक (केए ५२ बी ७२२१) माशेलहून गवंडाळी पूलमार्गे पणजीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच कुंडई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी तेथील नागरिकांच्या सहकार्याने त्या ड्रायव्हरला केबिनमधून ओढून बाहेर काढले. त्यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णवाहिकेतून घटनास्थळी पोहोचली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रुग्णवाहिकेतील डॉक्टरने त्या चालकाला मृत घोषित केले. 

म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे हवालदार सामीर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविण्यात आले. जवळ कोणतेच ओळखपत्र सापडले नाही. फक्त त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून त्याची माहिती पोलिस घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष

पंधरा दिवसा पूर्वीही रात्री 12 वा. अशाच प्रकारे ट्रकने धडक दिली होती. त्यावेळी सुदैवाने मोठी हानी झाली नव्हती. हा अवजड वाहनांना मार्ग बंद आहे. तरीसुद्धा या मार्गावर वाहने येतात.

त्यामुळे अनेक वेळ असे अपघात होतात, तसेच वाहतूक कोंडीही होते. माशेलातील पोलिसांचे दुर्लक्ष होते. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या ट्रकना अडविले पाहिजे. माशेल बाजार, बगलमार्गावर बंदीचा फलक लावणे अवश्य आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

वडापाव गाड्याचे नुकसान

ट्रॅकने त्या कमानीला धडक दिल्यानंतर त्याच जोशात त्याने ट्रक मागे घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वडा पाव गाड्याला धडक दिली. त्यामुळे त्या गाड्याचेही बरेच नुकसान झाले आहे. या गाड्याजवळ इतरही गाडे, दुकाने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

फोटो द्या आणि कलात्मक चित्र मिळवा! गोव्यात सुरू झालाय 'मारियो मिरांडा'च्या शैलीत स्वतःचं चित्र बनवून देणारा उपक्रम

Goa News Live Update: गणेशोत्सवाच्या प्रवासासाठी पुरेशी व्यवस्था करण्यासाठी केटीसी सज्ज

Sindhudurg Bus Cancelled: गणपतीच्या खरेदीला जायचंय पण बसच नाही! सिंधुदुर्गात एसटीच्या 230 फेऱ्या रद्द, मुंबई-ठाण्याला पाठवल्या बस

SCROLL FOR NEXT