Truck Accident in Kamrabhat Panjim
Truck Accident in Kamrabhat Panjim Dainik Gomantak
गोवा

काम्राभाट परिसरात ट्रकचा अपघात, पुलाचा कठडाही कोसळला

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीत ताळगावजवळ असलेल्या काम्राभाट येथे ट्रकचा अपघात झाला आहे. काम्राभाट येथील पुलावर ट्रकचा अपघात झाल्याने पुलाचा कठडा कोसळला. आहे. मात्र अपघाताचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही. (Truck Accident in Kamrabhat Panjim News Updates)

काम्राभाट येथे सोमवारी सकाळी ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. ट्रक खडीने भरलेला असल्याने अपघात (Accident) झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती. पुलावरच ट्रक कलंडल्याने पुलाच्या कठड्याचं नुकसान झालं आहे. अपघातात पुलाचा कठडा कोसळल्याची माहिती आहे. दरम्यान ट्रकला बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती आहे.

गोव्यात अपघातांचं सत्र वाढलं असून फोंडा परिसरातील खांडेपार येथे शुक्रवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मालवाहू ट्रक आणि रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातात कोल्हापूरहून आलेला रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता.

काही दिवसांपूर्वी ओल्ड गोवा (Old Goa) परिसरात एका तरुणाचा माड कोसळून अपघात झाला होता. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर बांबोळी परिसरात गोमेकॉसमोर (GMC) एक भरधाव प्रवासी बस उलटून अपघात झाला होता, ज्यात बसमधील प्रवासी जखमी झाले होते आणि चालक गंभीर जखमी झाला होता. फर्मागुडीमध्येही दुचाकीचालक कंटेनरखाली आल्याने अपघात झाला होता. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्याच्या पत्नीवर उपचार सुरु होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT