साखळी: विठ्ठलापूर साखळी येथील श्री विठ्ठल रुखुमाई मंदिराच्या प्रांगणात तसेच वाळवंटी नदीपात्रात दरवर्षी होणारा प्रसिद्ध त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन सोहळा बुधवार, ५ रोजी होणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारी सरकारतर्फे विठ्ठलापूर येथील दीपावली उत्सव समिती व श्री विठ्ठल पंचायतन संस्थांच्या सहकार्याने सुरू आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळीपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार असून रात्री श्री देव विठ्ठल रखुमाईची पालखी वाळवंटी नदीकिनारी आल्यानंतर आकर्षक नौका नदीपात्रात सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती दिपावली उत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मंगळवार, ४ रोजी श्री विठ्ठल मंदिरात कला कीर्तन होणार आहे. त्यानंतर ५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व नौकानयन सोहळा होणार आहे. ५ वा. श्रीकृष्णाची रथातून वाद्यवृंद व दिंडीसह मिरवणूक होईल. संध्या. ७ वा.सुवासिनींतर्फे वाळवंटीत दीपदान होईल. रात्री ११ वा. नौकानयन सोहळा सुरू होईल.
११.१५ वा. त्रिपुरासूर वध हा दशावतारातील एक भाग सादर होईल. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री रमेश तवडकर, जीटीडीसीचे अध्यक्ष केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दिव्या राणे, नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, लक्ष्मण गुरव व इतरांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी अध्यक्ष नरेंद्र जोगळे, समीर देसाई, अविनाश नाईक, दिनेश उसपकर, जितेंद्र नाईक, सोमनाथ मोरजकर, ज्ञानेश्वर बाले आदींची उपस्थिती होती.
या नौकानयन स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु. ४० हजार, रु. ३५ हजार,रु. ३० हजार,रु.२५ हजार,रु.२० हजार व प्रशस्तीपत्र, शिवाय पाच स्पर्धकांना रू. १५ हजारांची उत्तेजनार्थ बक्षिसे. परीक्षकांतर्फे निवडलेल्या विशेष १० नौकांना रु. ८ हजार तर उर्वरित परीक्षकांतर्फे पात्र सहभागी स्पर्धांना रु. ५ हजार देण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.