tripurari poornima  Dainik Gomantak
गोवा

Tripurari Poornima: वाळवंटीला पूर, साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी; नौकानयन स्पर्धेला अवकाळी पावसाची भीती?

Sanquelim boat festival: राज्य शासन आणि दीपावली उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणारा त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन स्पर्धा सोहळा ५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे

Akshata Chhatre

Tripurari Poornima Goa: दिवाळी संपताच ज्याची आतुरता असते, तो 'व्होडली दिवाळी' अर्थात तुळशी विवाह आणि त्यानंतरचा त्रिपुरारी पौर्णिमा सोहळा यंदा अवकाळी पावसामुळे संकटात सापडलाय. साखळी येथील विठ्ठलापूर येथे राज्य शासन आणि दीपावली उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणारा त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन स्पर्धा सोहळा बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

वाळवंटी नदीला पूर, नौकानयन स्पर्धेवर प्रश्नचिन्ह

उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वाळवंटी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी भरले असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे. जर हीच पुरस्थिती स्पर्धा सुरू असताना कायम राहिली, तर नौका पाण्यात उतरवता येणार नाहीत. अशा परिस्थितीत नौकांचे फक्त मंदिराकडेच परीक्षण केले जाईल.

नदीपात्रातील नौकानयन स्पर्धेच्या या दैदिप्यमान सोहळ्याला हजारोंच्या संख्येने लोक दरवर्षी उपस्थित राहतात. मात्र, यावर्षी नदीला पूर आल्यास हजारो लोकांना या नेत्रदीपक सोहळ्याला मुकण्याची शक्यता आहे.

तुळशी विवाहाच्या तयारीवरही परिणाम

त्रिपुरारी पौर्णिमेसोबतच, याच पावसाचा फटका तुळशी विवाहाच्या तयारीवरही बसला. दिवाळी संपल्यानंतर लगेच तुळशी विवाहाची तयारी सुरू होते. मात्र, ऐन तुळशी विवाहाच्या तोंडावर शुक्रवारी दिवसभर पाऊस पडल्यामुळे नागरिकांच्या कामांमध्ये अडथळा आला.

अनेक तुळशी वृंदावनांना मारलेला रंगही पावसामुळे खराब झाला आहे आणि वृंदावनाला रंग देण्याची कामे खोळंबून पडली. साखळीत बाजार भरला असला तरी, पावसाच्या समस्येमुळे ग्राहकांची संख्या कमी झाली असल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आणि ग्राहकांच्या अनुपस्थितीमुळे विक्रीवर परिणाम झाल्याचं सांगितलं.

हवामान विभागाकडून तात्पुरता दिलासा

या सर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. शुक्रवारी दिवसभर आणि शनिवारी सकाळपासून तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी, हवामान खात्यानुसार पुढील सात दिवस राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे रविवारच्या तुळशी विवाह समारंभाला पावसाचा कोणताही अडथळा येणार नाही अशी आशा आहे, त्यामुळे खोळंबलेली कामे आता नागरिकांना त्वरित पूर्ण करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

SCROLL FOR NEXT