Goa Pune Crime News Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात सापडलेत ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी', पुण्याच्या फार्मसी दुकानदाराची तिघांकडून 30 लाखांची फसवणूक

संशयितांनी फार्मसी दुकानात दररोज येऊन दुकानदाराशी ओळख वाढवली.

Pramod Yadav

Goa Pune Crime News: गोव्यात रस्ते खोदकाम करताना ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी सापडल्याचे सांगत, पुण्यातील एका फार्मसी दुकानदाराची तिघांकडून 30 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

तिन्ही संशयितांची अद्याप ओळख पटली नसून, त्यांच्या विरोधात पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय फार्मसी दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन खडकी पोलिसांनी एक महिला व दोन पुरुष संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

संशयितांनी फार्मसी दुकानात दररोज येऊन दुकानदाराशी ओळख वाढवली. दुकानदाराचा विश्वास जिंकल्यानंतर त्यांना गोव्यात रस्ता खोदकाम करताना ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी सापडल्याचे सांगितले. 28 किलो वजनाची सोन्याची नाणी पन्नास लाख किमतीला देण्याचे त्यांच्यात डिल झाले. दरम्यान, दुकानदाराने त्याच्याकडे केवळ तीस लाख रुपये असल्याचे सांगितले. त्याबदल्यात किलो वजनाची नाणी देण्याचे निश्चित झाले.

सोन्याची खात्री करण्यासाठी दुकानदाराने सॅम्पल मागवून घेतले. संशयितांनी सॅम्पल म्हणून सोन्याचे नाणे आणि त्यावर ब्रिटीशकालीन शिक्का उमटवून त्याला दाखवले. दुकानदाराची खात्री पटल्यानंतर डिल पक्की झाली.

चाकण, म्हाळुंगे येथे संशयित आणि दुकानदार यांच्यात सोन्याची नाणी आणि पैशांची बॅग एकमेकांना एक्सेंज करण्यात आली. दुकानदाराने बॅग तपासून पाहिली असता ती बनावट असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. सोन्याची नाणी ऐवजी त्याला सोन्याचा मुलामा दिलेली इतर धातूंची नाणी देण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT