Subhash Phal Desai Dainik Gomantak
गोवा

Tribal Festival: केपे येथे आजपासून 'आदिवासी उत्सव', मंत्री फळदेसाईंच्या हस्ते होणार उद्‍घाटन

13th Tribal Festival in Goa: केपे येथील आदिवासी संघटनेने १८ व १९ जानेवारी रोजी आदिवासी उत्सवाचं आयोजन केलं असून यंदा हा तेरावा उत्सव आहे.

Sameer Amunekar

केपे: केपे येथील आदिवासी संघटनेने १८ व १९ जानेवारी रोजी आदिवासी उत्सवाचं आयोजन केलं असून यंदा हा तेरावा उत्सव आहे. सदर उत्सव कपेलाभाट दियाव येथं पार पडणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते या उत्सवाचं दुपारी ३ वा. उद्‍घाटन होणार असून कुडचडेचे आमदार नीलेश काबराल, पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर, कला व सांस्कृतिक खात्याचे संचालक सगुण वेळीप, राय पंचायतीचे सरपंच जोजफ वाझ, केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर व मामलेदार नाथन अल्फान्सो उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसीय आदिवासी उत्सवात आदिवासी समाजातर्फे विविध सांस्कृतिक, लोकनृत्य, आयुर्वेदिक वनस्पती, पारंपारिक खेळ, आदिवासी साड्यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

१८ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता फादर एड्रिनो डिकॉस्ता दिग्दर्शित कोकणी तियात्र सादर केला जाणार असून माजी आमदार बाबू कवळेकर यांच्या हस्ते तेराव्या वार्षिक स्मरणिकेचे अनावरण होणार आहे.

यावेळी माजी आमदार क्लाफासिओ डायस, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ देसाई, सरपंच देविदास देईकर व फा.कारलिस्ट कुयल्हो हजर राहणार आहेत. १९ रोजी सकाळी कनिष्ठ व वरिष्ठ गटासाठी वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धेचे आयोजन केलं आहे.

रविवारी लोकोत्सव

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते १९ रोजी दुपारी ३ वा. लोकोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, उपस्थित राहणार आहेत.

संध्याकाळी ५ वाजता समारोप कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार आंतोन वाझ, नगरसेवक देश नाईक व रेमेंत रिबेलो उपस्थित राहणार आहेत, असे जॉन फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT