Tribal culture
Tribal culture  Dainik Gomantak
गोवा

आधुनिकतेमुळे आदिवासी संस्‍कृती लुप्‍त; लोकगीतांचे संवर्धन आवश्‍‍यक

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याची आदिवासी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असून आधुनिकतेच्या प्रभावामुळे ती झपाट्याने कमी होत आहे. मांड ही आदिवासी (Tribal) संस्कृतीची सामाजिक, धार्मिक आणि कृषी आर्थिक संस्था होती. ती केवळ लोककला सादर करण्याची जागा नव्हती, तर आदिवासी गावांच्या ग्रामप्रशासनात बुधवंत सारखे प्रभारी होते. बुधवंत यांच्‍या भूमिका आज काळाच्या ओघात नामशेषही झाल्‍याची खंत डॉ. रोहित फळगावकर यांनी व्‍यक्त केली.

दिशा फाउंडेशन व आदिवासी विकास समितीच्या सहकार्याने केपे येथील शासकीय विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नुकतीच बिरसा मुंडा जयंती साजरी केली. यावेळी डॉ. रोहित फळगावकर यांनी ‘गोव्याची आदिवासी संस्कृती’ याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. फळगावकर यांनी गोव्यातील आदिवासी समाजातील विविध लोकगीतांचे दस्तावेजीकरण करण्याच्या गरजेवरही भर दिला. लोकगीते हा समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा स्रोत कशी ठरू शकतात, हे त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून अधोरेखित केले.

यावेळी दिशा फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक विनित कुंडईकर यांचेही भाषण केले. डॉ. सुशीला मेंडस यांनी स्वागत केले. डॉ. प्रियांका वेळीप यांनी सूत्रसंचालन केले.

अभ्‍यासकांचे स्रोत हरवताहेत...

आदिवासींचे बहुतेक दागिने दुर्मिळ झालेले आहेत व अभ्यासासाठी उपलब्ध नाहीत. ते कायमचे हरवले आहेत. कळायो, दांडे या धातूच्या बांगड्या केवळ नाहीशा झाल्या नाहीत, तर त्यांची नावेही आज लोप पावत आहे.

गोव्यातील (goa) आदिवासींना विविध औषधी वनस्पतींचे ज्ञान कसे आहे? हे त्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. मुतखडा, मधुमेह इत्यादींवर अजूनही औषधे देणाऱ्या लोकांच्या नावांची यादी त्यांनी तयार केली. याची डॉक्युमेंटरी केली नाही, तर हे ज्ञानही आपण गमावून बसू. गोव्यातील आदिवासींवर एथनो-मेडिसिन, मानववंशशास्त्र, संस्कृती अभ्यास, लोक अभ्यास करण्यास वाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT