Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport:'ट्रेसपासिंग करणाऱ्यांना गोळी घातली जाईल'; दाबोळी विमानतळजवळील नौदलाच्या फलकाची चर्चा

Navy Base At Dabolim Airport: दाबोळी दक्षिण गोव्यातील एक प्रमुख विमानतळ आहे. हे विमानतळ नौदलाचा तळ देखील आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Dabolim Airport Navy Board

मडगाव: दक्षिण गोव्यात असणाऱ्या देशातील नौदलाच्या सर्वात मोठ्या तळावर सध्या झळकत असलेला एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दाबोळी विमानतळावर असणाऱ्या या फलकावर ट्रेसपासिंग करणाऱ्यांना गोळी घातली जाईल, असे लिहण्यात आले आहे. या फलकाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ गोव्यातील एक प्रमुख विमानतळ आहे. हे विमानतळ नौदलाचा देशातील सर्वात मोठा तळ देखील आहे. आयएनएस हंसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तळाच्या (दाबोळी विमानतळ) गेटवर हा फलक लावण्यात आला आहे.

'ट्रेसपासिंग करणाऱ्यांना गोळी घातली जाईल. बचावलेल्यांना पुन्हा गोळी घातली जाईल,' असे या फलकावर लिहण्यात आले आहे.

दाबोळी दक्षिण गोव्यातील एक प्रमुख विमानतळ आहे. हे विमानतळ नौदलाचा तळ देखील आहे. नौदलाचा तळ असल्याने हे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बंद होईल, अशी चर्चा देखील वारंवार समोर येते. दरम्यान, सरकार आणि नौदल अधिकाऱ्यांनी देखील विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद होणार नाही, असे आश्वस्त केले.

दाबोळीत नौदलाच्या बंधनांमुळे अनेक घरांच्या बांधकामावर देखील बंधने येतायेत. याबाबत स्थानिक आमदार माविन गुदिन्हो यांनी वारंवार आवाज उठवला आहे. अनेकांना घरांच्या उंची वाढवण्यास तसेच, इतर बांधकाम करण्यास अडथळा येतो त्यामुळे स्थानिक नाराजी व्यक्त करतात. दरम्यान, आता या फलकामुळे परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT