Tree Plantation Dainik Gomantak
गोवा

Tree Plantation in Goa: जुलैमध्ये होणार 380 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण

उपवनसंरक्षक जाधव यांची माहिती : राज्यातील जंगलांमध्ये देशी दुर्मीळ झाडांची करणार लागवड

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

Tree Plantation यंदा वणव्याच्या भक्षस्थानी पडलेल्या वनस्पती नव्याने उभ्या करण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले असून पाऊस स्थिरावल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात वृक्षारोपणाला सुरवात करण्यात येणार आहे.

सुरवातीला आगीच्या भक्ष्यस्थळी पडलेल्या 380 हेक्टर वनक्षेत्रातील वृक्षारोपणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यानंतरही ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक आनंद जाधव यांनी दिली आहे.

राज्यात मार्च महिन्याच्या सुरवातीला अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान, राखीव जंगल, खासगी वन क्षेत्रात अभूतपूर्व वनवे लागले. हे वनवे मानवनिर्मित होते या मतापर्यंत वन खाते आले आहे. तसा अहवाल वन खात्याने तयार केला आहे. यात विविध स्तरांवरचे सुमारे 380 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले.

यात जैवविविधतेची कधीही भरून न निघणारी अपरिमित हानी झाली. या आगीच्या भक्षस्थानी प्राण्यांबरोबर फ्लोरा फोना अर्थात नानाविध प्रकारच्या वनस्पतींचे मोठे नुकसान झाले. मोठ्या वृक्षांबरोबर झुडपे, वेली, खुरट्या वनस्पती, गवतांचे विविध प्रकार नष्ट झाले.

ही वनसंपदा पुन्हा उभी करण्यासाठी अनेक वर्ष लागतील, पण याची सुरवात वन खात्याने या वर्षापासूनच सुरू केली आहे. यासाठी धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण येथील नर्सरीमध्ये रोपे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

बिया गोळ्यांचा वापर

जंगलातील अनेक ठिकाणी वन मजूर, कर्मचारी अथवा सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी पहिल्यांदाच बिया गोळ्यांचा (सीड बॉल) उपयोग करण्यात येणार आहे. सध्या या बिया गोळ्या तयार करण्याचे काम सुरू असून वृक्षारोपण मोहिमेदरम्यान या बिया गोळ्या जंगलातील दुर्गम भागात टाकण्यात येणार आहेत.

तपशीलवार नोंद

राज्यात अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान आणि खासगी वन क्षेत्रांमध्ये विपुल वनसंपदा आहे. हरित क्षेत्राचे (ग्रीन कव्हर) प्रमाणही राष्ट्रीय प्रमाणापेक्षा राज्यात जास्त आहे. हा पश्चिम घाटाचा मध्य कॉरिडोर असल्याने विविध प्रकारची झाडे, झुडपे, वृक्ष, वेलींचा यात समावेश आहे.

यात देशी (प्रदेशनिष्ठ) झाडे, झुडपे, गवतांचा समावेश आहे. वन विभागाने या वनस्पतींची तपशीलवार नोंद केली असून अशाच देशी वनस्पतींची नव्याने लागवड करण्यात येणार आहे, अशी माहितीही जाधव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Oceanman Controversy: मच्छीमारांनी काय करावे? 'ओशनमॅन'वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; प्रशासन पूर्णपणे खालावल्याचे आरोप

EV Bus Strike: पणजीच्या प्रवाशांना 'स्मार्ट शॉक', 48 इलेक्ट्रिक बसेस अचानक गायब; वेतन थकल्यामुळे बस चालकांचा संप

Chhath Puja: गोव्यात उत्तर भारतीयांची छठपूजा उत्साहात! 4 दिवसीय व्रताची सांगता; सूर्यपूजनासाठी किनाऱ्यांवर लोटला ‘जनसागर’

Goa Live News: नायबाग येथे गोळीबार: वाळू उपशाच्या वादात दोघे जखमी

‘माझे घर’ हा केवळ परप्रांतीयांची ‘व्‍होटबँक’ जपण्‍यासाठी खटाटोप! विजय, मनोज, विरेश यांचे मत; विरोधकांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT