Mopa Link Road Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोडसाठी झाडांची कत्तल संपली, आता सपाटीकरणावर जोर

मोजक्याच पोलिसांचा फौजफाटा घेऊन काम सुरु असल्याचं चित्र

दैनिक गोमन्तक

मोरजी : मोपा लिंक रोडसाठी शेवटची झाडे 7 मार्च रोजी बुलडोझरने कापण्यात आली आहेत. यानंतर स्थानिकांचा विरोध डावलून आता रस्त्याचे खोदकाम युद्धपातळीवर चालू आहे. हे काम करत असताना मोजक्याच पोलिसांचा फौजफाटा घेऊन काम सुरु झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. (Mopa Link Road News Updates)

एकीकडे मोपा (Mopa) लिंक रोडसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया चुकीच्या मार्गाने केल्याची पीडित शेतकऱ्यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी 25 मार्च रोजी होणार आहे, मात्र दुसऱ्या बाजूने वारखंड पंचायतीने लिंक रोड बनवणाऱ्या कंपनीला बेकायदा रस्ता करत असल्याचा त्वरित बंद करावा अशी नोटीस पाठवली आहेत. या नोटिसीला आव्हान देताना कंपनीने पंचायत संचालनालयाकडून स्थगिती मिळवलेली आहे. 15 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

आताच मोपा लिंक रोडसाठी परवाना मिळाला आहे का अशी विचारणा राज्य (Goa) पर्यावरण पडताळणी प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. परवाना नसेल तर त्याबद्दल प्राधिकरणाने स्पष्टीकरण मागितले आहे. स्पष्टीकरण सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना खात्याने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. पेडणे (Pernem) तालुक्यातील मोपा विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे अशी तक्रार प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

झाडांची कत्तल करत नैसर्गिक स्त्रोत नष्ट केले जात आहेत. मोपा लिंक रोडमुळे जंगली प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. तसंच या रस्त्यासाठी पर्यावरण मान्यता घेण्यात आलेली नाही, असेही तक्रारदारांचं म्हणणं आहे. दरम्यान 7 मार्च रोजी मोपा लिंक रस्ता करणाऱ्या कंपनीने जी शेवटची झाडे होती, ती कापून टाकली आणि आज मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात खोदकाम करणारी यंत्रणा आणि जमीन सपाटीकरण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT