Goan Students Returned from Ukraine Dainik Gomantak
गोवा

1600 किमी प्रवास करून गाठली युक्रेनची हद्द, विद्यार्थिनी सुखरुप फोंड्यात

दैनिक गोमन्तक

फोंडा : मायभूमीत पाऊल ठेवताच हायसे वाटले. युद्धग्रस्‍त युक्रेनची बॉर्डर गाठण्यासाठी सुमारे 1600 किलोमीटरचा प्रवास मिळेल त्या वाहनाने केला. त्यासाठी बसगाडी, ट्रेनचा वापर केला आणि एकदाची युक्रेनची हद्द पार केली. युक्रेनच्या क्रॉपिन्स्की शहरपासून हा प्रवास सुरू झाला तो युक्रेनची हद्द ओलांडून हंगेरीत प्रवेश केल्यानंतर संपला, जेथे भारतीय दूतावासातर्फे आम्हाला सुरक्षित भारतात पोचवण्याची जबाबदारी घेण्‍यात आली आणि पार पाडली.

त्यामुळेच आज मी गोव्यात माझ्या कुटुंबाकडे सुरक्षितपणे पोचू शकले, अशा शब्दांत फोंड्यात (Ponda) सेंट ॲनी बेकरीजवळील इमारतीत राहणाऱ्या कॅरन फर्नांडिस या विद्यार्थिनीने सांगितले. ती युक्रेनमध्‍ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्‍यासाठी गेली होती.

कॅरनचे वडील स्वतः डॉक्टर आहेत. त्‍यांना दोन मुली. त्‍यातील मोठी मुलगी कॅरन वैद्यकीय शिक्षण घेण्‍यासाठी युक्रेनमध्ये गेली होती. पण रशिया-युक्रेन युद्ध भडकल्‍यानंतर तेथे मोठा हाहाकार उडाला. कॅरनने सांगितले, अत्यंत तणावाच्या स्थितीत आम्ही दिवस काढले आणि भारत सरकारने (Government) सांगितल्याप्रमाणे एकदाची युक्रेनची हद्द पार केली.

पण ही हद्द पार करताना आलेली संकटे, तणाव आणि भयानक अनुभव आपण शब्‍दांत सांगू शकत नाही, असेही ती म्‍हणाली. मात्र आता कुठे तरी ‘रिलॅक्स’ झाल्याचे कॅरनने आई-वडील आणि बहिणीला सोबत घेऊन सांगितले. या तिघांनीही कॅरनचे साश्रुनयनांनी स्वागत केले. मुलगी सुखरूप घरी पोचली हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट. भारत सरकारने केलेली मदत उल्लेखनीय असून आम्‍ही सरकारचे खूप आभारी आहोत, असे त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी कॅरन व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्‍यांचेही या कुटुंबाने आभार मानले.

सहा महिन्‍यांचाच अभ्‍यासक्रम होता बाकी

युक्रेनमध्ये (Ukraine) एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना कॅरनचा फक्त सहाच महिन्यांचा अभ्यासक्रम शिल्लक राहिला होता. येत्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात कॅरन डॉक्टरकीची डिग्री घेऊनच गोव्यात परतणार होती. पण त्यापूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरूवात झाली व हा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. युक्रेनमधील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आपण तेथे जाऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करू, असा विश्‍वास कॅरनने हिने व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT