travel best tourist destinations in goa, Places to visit in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सहलीला जाताय, 'या' ठिकाणांना द्या अवश्य भेट

गोव्यात तुम्हाला ऐतिहासिक चर्च, मंदिरे आणि अनेक आकर्षक पर्यटन स्थळे पाहायला मिळतील

दैनिक गोमन्तक

गोव्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे: गोवा हे तरुण आणि जोडप्यांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांना येथील नाइटलाइफ आणि मजा आवडते. प्रत्येकाला गोव्याच्या समुद्रकिना-याच्या दृश्यांचा आनंद घ्यायचा असतो. असंही म्हटलं जातं की, खळखळणाऱ्या पाण्याच्या लाटांचा अनुभव तुम्हाला जवळून अनुभवायचा असेल, तर गोव्याला जा. (travel best tourist destinations in goa)

गोव्यात (goa) सर्व वयोगटातील लोक सहलीला जातात. येथे तुम्हाला आकाशाला भिडणारी खजुरीची झाडे दिसतील आणि आकर्षक पर्यटन स्थळांचे सौंदर्य तुम्हाला ताजेपणाने भरून देईल. कोलवा बीच आणि पाळोळे बीचवर जगभरातून पर्यटक येतात. येथे तुम्हाला पोर्तुगीज प्रभाव असलेले पदार्थ खायला मिळतील. ऐतिहासिक चर्च, मंदिरे आणि अनेक आकर्षक पर्यटन (Tourism) स्थळे पाहायला मिळतील. याशिवाय चविष्ट सी फूडचाही आस्वाद घेऊ शकता. तुम्ही येथे स्पार्कलिंग मार्केटमध्ये खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे भेट दिल्याशिवाय तुमची गोवा सहल अपूर्ण राहू शकते… (Places to visit in Goa)

बागा बीच

बागा बीच हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे उत्तर गोव्यात आहे. बागा बीचचे नाव गोव्यातील सर्वोत्तम बीचमध्ये येते. म्हणूनच गोव्याला जाताना बागा बीचवर नक्की जा. येथे तुम्ही स्कूबा-डायव्हिंग आणि काइट सर्फिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

नेत्रावली तलाव

गोव्यातील नेत्रावली तलावाला भेट द्यायलाच हवी. दिसायला अतिशय सुंदर दिसणार्‍या या तलावाच्या पाण्यात आपोआप बुडबुडे निर्माण होतात. नेत्रावळीत लांबून पर्यटक येतात. या सरोवराच्या तळाशी मिथेन वायूचा नैसर्गिक साठा आहे, त्यामुळे सतत होणाऱ्या गळतीमुळे तलावाच्या पाण्यात बुडबुडे तयार होतात. हे अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि लाखो पर्यटक येथे येतात.

कुंबरजुआ कालवा

गोव्यात कुंबरजुआ कालवा खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बोट राइड घेऊ शकता. बोट राइड साहसाची आवड असलेले लोक येथे जाऊ शकतात.

हिवरे फॉल्स : 'हिवरे' फॉल्स हे वाल्पोई शहराजवळ आहे, हे ठिकाण प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये असावे. नयनरम्य ठिकाण असेलेली ही जागा तुम्हाला सोडू वाटणार नाही.

तांबडी सुर्ला फॉल्स : तांबडी सुर्ला हा पश्चिमेकडील घाटात लपलेला हा प्राचीन धबधबा आहे. हे कॅसकेड भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि मोल्लेम नॅशनल पार्कमध्ये आहे.

अरवलेम फॉल्स : अरवलेम हा धबधबा उत्तर गोव्यात आहे. जेव्हा तुम्ही या धबधब्यावर जातात तेव्हा आपण अरवलेम रॉक-कट लेण्यांना भेट देऊ शकता, ज्या 12 व्या शतकात बौद्ध भिक्खूंनी कोरलेल्या मानल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT