Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: महत्वाची घडामोड! गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर गोव्यातील आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Goa Police: केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी याबाबतचा आदेश जारी केला

Ganeshprasad Gogate

Goa Police: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सचिव तथा आयएएस अधिकारी अजित रॉय यांच्यासह उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस निधीन वाल्सन, दक्षिण गोवा अधीक्षक अभिषेक धानिया आणि आयपीएस अस्लम खान यांची गोव्यातून बदली झाली आहे.

तर, आयएएस इ. वालावन, अंकीत यादव यांच्यासह एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजबीर सिंग यांचे सुपुत्र रोहीत सिंग व राहुल गुप्ता या आयपीएस अधिकारी गोव्यात सेवा बजावण्यासाठी येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

आयएएस अजित रॉय यांची गोव्यातून मिझोरम येथे, तर आयपीएस निधीन वाल्सन, अस्लम खान आणि अभिषेक धानिया यांची दिल्ली येथे बदली झाली आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन- बाणास्तरी अपघात, हणजूण येथील पेट्रोलिंग मोहिम, डॉमनिक डिसोझा यांसारख्या प्रकरणांमध्ये शोधकार्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावली होती.

गोव्याला मिळाले नवे आयएएस आणि आयपीएस अधिकारी!

2012 च्या एग्मू कॅडरचे आयएएस अधिकारी इ. वालावन यांनी यांची पुदुच्चेरीतून, अंकित यादव यांची अंदमान आणि निकोबारमधून, तर आयपीएस अधिकारी रोहीत सिंग आणि राहुल गुप्ता यांची अरुणाचल प्रदेशमधून गोव्यात बदली झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

Goa Live Updates: राज्यातील खनिज वाहतूकदारांना फिटनेस प्रमाणपत्राबाबत दिलासा

Jatindranath Das: भगतसिंगांसोबत केले 63 दिवस उपोषण, तुरुंगातच सोडले प्राण; क्रांतिकारी 'जतिंद्रनाथ दास' यांचे स्फूर्तिदायक स्मरण

SCROLL FOR NEXT