Transfers Dainik Gomantak
गोवा

Transfers of Administrative Officers: गोव्यातील 18 कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस महिला अधिकारी ईग्ना क्लिटस यांच्यासह राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Transfers of Administrative Officers एक आयएएस महिला अधिकारी ईग्ना क्लिटस यांच्यासह राज्य नागरी सेवेतील 18 कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगेचे मामलेदार गौरव गावकर यांच्याकडे सांगे पालिका मुख्याधिकारीपद तसेच फोंड्याचे बीडीओ सिद्धेश केरकर यांच्याकडे सांगे बीडीओचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. हे बदलीचे आदेश कार्मिक विभागाच्या अवर सचिव इशांत व्ही. सावंत यांनी जारी केले आहेत.

आग्मूत केडरमधील 2020 च्या आयएएस अधिकारी इग्ना क्लिटस हे प्रोबेशनरी अधिकारी असल्याने त्यांची फोंडा उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कनिष्ठ श्रेणी अधिकारी असलेले व पदाच्या प्रतीक्षेत असलेले सुयश सिनाई खांडेपारकर यांची दक्षिणेत प्रकल्प अधिकारी (डीआरडीए), पदाच्या प्रतीक्षेत असलेले हिमांशू पाटणेकर यांची उद्योग, व्यापार व वाणिज्य उपसंचालकपदी तसेच उपसंचालक प्रशासनचा अतिरिक्त ताबा देण्यात आलाय.

दिप्ती गावकर यांची उच्च शिक्षण उपसंचालकपदी, ईश्‍वर मडकईकर यांची उत्तर गोवा (निवडणूक) उपजिल्हाधिकारीपद, ओंकार असोलकर यांची पशु संवर्धन उपसंचालकपदी (प्रशासन), नरेश गावडे यांची दक्षिण - १ उपजिल्हाधिकारी व २ चा अतिरिक्त ताबा, भूसंपादन उत्तर उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांना विशेष भूसंपादन अधिकारी (पीडब्ल्यूडी)चा अतिरिक्त ताबा देण्यात आलाय.

उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासक शिवप्रसाद नाईक यांची भूसंपादन उत्तर गोवा उपजिल्हाधिकारीपद, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांची दक्षिण विभाग कोमुनिदाद प्रशासकपदी, आश्‍विनी भगत यांची व्यावसायिक कर सहाय्यक आयुक्तपदी, सहकार उपनिबंधक दत्तराज देसाई यांची सरकारी तंत्रनिकेतन उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे.

रवीशेखर निपाणीकर सासष्टी उपजिल्हाधिकारीपदी

मुरगाव उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर यांची सासष्टी उपजिल्हाधिकारीपदी, वन वसाहत अधिकारी भगवान करमली यांची मुरगाव उपजिल्हाधिकारीपदी, डीआरडीए प्रकल्प अधिकारी रघुराज फळदेसाई यांची दक्षिण भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी, दक्षिण विभाग कोमुनिदाद प्रशासक जुआंव फर्नांडिस यांची कुंकळ्ळी पालिका मुख्याधिकारीपदी, फोंडा उपजिल्हाधिकारी सीताराम सावळ यांची सहकार उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे.

उत्तर गोवा डीआरडीए प्रकल्प अधिकारी वेल्टन तेलीस यांच्याकडे सार्वजनिक गाऱ्हाणी उपसंचालकपदाचा ताबा, अपना घर उपसंचालक गिरीश सावंत यांना महिला व बाल कल्याण उपसंचालकाचा अतरिक्त ताबा, केपे उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर यांना वन वसाहत अधिकारी (दक्षिण) अतिरिक्त ताबा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT