Doctor And Nurse, Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa जिल्हा इस्पितळात परिचारिका व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा इस्पितळातील व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोविड महामारीच्या (Covid 19) पहिल्या पेक्षा दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना कठीण परिस्थितीचा समना करावा लागला. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health workers) रुग्णांची तपासणी, त्यांची देखभाल करताना अनेक समस्या जाणवल्या. जास्त करुन परिचारिकांना मानसिक व भावनिक त्रास झाला. आता कोविडची तिसरी लाट येणार असे भाकित केले जात असताना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वरील समस्या जाणवू नये म्हणून डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिवाय इस्पितळातील सोयी-सुविधा, साधन सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच व्यवस्थापनात दोष राहु नये या साठी उपाययोजनांचा विचार व तयार करण्यात येत आहे. (Training was imparted to the nurses and staff at South Goa District Hospital)

हल्लीच कॅनडा स्थित मानसिक रोग  व चिंतन प्रशिक्षण तज्ञ  लिसा पिंटो यांच्या मार्फत परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले. यात हॉस्पिसियो मडगाव व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील 40 परिचारीकांनी भाग घेतला. या मार्गदर्शनामुळे आमच्यावरील मानसिक भार बऱ्याच अंशी कमी झाला. आमची मानसिक स्थिती मजबुत बनली आहे व आमचा आत्मविश्र्वासातही भर पडली असल्याचे काही परिचारीकांनी सांगितले.

दरम्यान, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. खास करुन बालकांसाठीच्या कक्षावर जास्त लक्ष देण्यात येत आहे. अजुन पर्यंत या इस्पितळात 5200 रुग्णांची नोंदणी झाली व सर्वांवर योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. तरी सुद्धा तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीची तयारी जोरात चालू असल्याचे नोडल अधिकारी डॉ. राजेश पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

इस्पितळात किती वेंटिलेर्स आहे त्याची पाहणी करण्यात येत आहे. बालकांचा कक्षाचा दर्जा उंचावण्यात येत आहे. कॅज्युअल्टी युनिट जवळच हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे अतिगंभीर रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

कोविडातुन तंदुरुस्त झालेल्या रुग्णांनाही जवळ जवळ तीन महिने काहीना काही त्रास जाणवतो. अशा रुग्णांची तपासणी, देखभाल करण्यासाठी खास कक्ष सुरु करण्यात आला आहे. शिवाय आयुश केंद्रही सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आयुर्वेदीक उपचाराची सोय इथे करण्यात आली आहे.  पोझिटीव असलेल्या रुग्णांचे स्वाब घेऊन व त्यांची तपासणी केली जाईल. अहवाल आल्यावर रुग्णाला योग्य तो उपचार देणे त्यामुळे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT