Gokul  Dainik Gomantak
गोवा

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

खेडे- सावईवेरे येथील गोकुळ कृष्णनाथ खेडेकर (वय 57) या महिला कलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने बोरी येथील फुगडी स्पर्धेच्या ठिकाणीच निधन झाले

Manish Jadhav

सावईवेरे: खेडे- सावईवेरे येथील गोकुळ कृष्णनाथ खेडेकर (वय 57) या महिला कलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने बोरी येथील फुगडी स्पर्धेच्या ठिकाणीच निधन झाले अन् त्यांची ही स्पर्धा अखेरची ठरली. कुटुंबातील एकुलती एक कमावती असलेल्या गोकुळच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी खेडे-सावईवेरे येथील श्री दत्तात्रय महिला मंडळ या संस्थेने बोरी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी कार्यक्रमात फुगडी स्पर्धेत भाग घेतला होता.

गोकुळ खेडेकर या एक उत्तम कलाकार असून सहकाऱ्यांसोबत त्याही गेल्या होत्या. या मंडळाने स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केल्यानंतर विश्रांतीसाठी म्हणून खाली बसल्या असतानाच गोकुळ हिला हृदयविकाराचा झटका आला.

फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवचिकित्सेत तिचे हृदयविकाराने निधन झाल्याचे स्पष्ट झाले.

गोकुळ यांच्या पश्‍चात पती कृष्णनाथ व एकुलता एक मुलगा मयूर असा परिवार आहे. अडीच वर्षांपूर्वी पतीला अर्धांगवायू झाल्याने ते काहीच काम करू शकत नव्हते.

गोकुळवर रविवारी (17 नोव्हेंबर) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोकुळ ही त्यांच्या घरातील एकुलती एक कमावती महिला होती. त्या फुगडी व दिंडी नृत्यात तरबेज होत्या. दिंडी सादरीकरण स्पर्धेत संत तुकारामाची भूमिका त्या उत्तमरीत्या साकारत होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT