Bull Fighting Dainik Gomantak
गोवा

Canacona: रस्त्यावरील बैलांच्या झुंजेने घेतला 40 वर्षीय व्यक्तीचा बळी; चार दिवसांचे उपचारही ठरले फेल

Canacona Goa: जया वरक दुचाकीवरुन खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Pramod Yadav

काणकोण: रस्त्याच्या मधोमध सुरु असलेली बैलांची झुंज एका ४० वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे. झुंज करणारे बैल दुचाकीवर असलेल्या व्यक्तीच्या अंगावर गेले आणि तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. गोमेकॉत उपचारादरम्यान शनिवारी (०४ डिसेंबर) या वक्तीचा मृत्यू झाला आहे.

जया वरक ( श्रीस्थळ, कोणकोण) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीस्थळ येथे रस्त्याच्या मधोमध दोन बैलांची झुंज सुरु होती. दरम्यान, यावेळी रस्त्यावरुन जात असलेल्या जया यांच्यावर दोन्ही बैल आले. यामुळे जया दुचाकीवरुन खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी वरक यांना सुरुवातीला काणकोण प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, चार उपचारानंतर देखील या व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी (०४ डिसेंबर) रोजी या वक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT