Youth Died In Traggic Accident At Navelim  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: नावेली येथे दुचाकी अपघातात खारेबांद येथील युवक ठार

दैनिक गोमन्तक

Youth Died In Traggic Accident At Navelim: बेदरकार वाहतूक करून दुसऱ्याच्‍या जिवावर उठण्‍याच्‍या घटना मडगाव - नावेली हमरस्‍त्‍यावर वाढल्‍या असून सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नावेली रस्‍त्‍यावर झालेल्‍या अपघातात दीप्‍तेश दळवी (३५) या युवकाचे निधन झाले.

‘हिट ॲण्‍ड रन’चे हे प्रकरण आहे, की स्‍वयं अपघात हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. याप्रकरणी मडगाव पोलिस तपास करीत आहेत.

मित्राला भेटून दीप्तेश दुचाकीवरून खारेबांद येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. हा प्रकार स्‍थानिकांच्‍या लक्षात आल्‍यावर त्‍यांनी जखमी दीप्‍तेशला तातडीने दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात हलविले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दीप्‍तेशच्‍या मागे पत्‍नी, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार असून या अपघाती मृत्‍यूने त्‍यांच्‍या घरात शोककळा पसरली होती. आज सकाळी त्‍याच्‍या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केल्‍यानंतर दुपारी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

नावेली-मडगाव या रस्‍त्‍यावर गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले असून अपघातांत जखमी झालेल्‍यांना मदत न करता वाहनचालकांनी पळ काढण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत.

हे अपघात दारू पिऊन वाहन चालविल्‍यामुळे होत असतात, अशी माहिती स्‍थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी दिली. हा अपघात अज्ञात वाहनाने धडक दिल्‍यामुळेच झाला असावा अशी शक्‍यताही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

यासंबंधी मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता, अपघात स्‍थळाची पाहणी केल्यानंतर हा मृत्‍यू दुसऱ्या वाहनाने धडक दिल्‍यामुळे होण्‍याची शक्‍यता बरीच कमी वाटते.

कदाचित हा स्‍वयं अपघात असावा. या भागातील सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन आम्‍ही पाहणी करत आहोत, असे त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT