Goa Human trafficking Dainik Gomantak
गोवा

Goa Human Trafficking: 'वेश्याव्यवसायासाठी' महिलांची तस्करी गोव्यात सर्वाधिक

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2021 सालामध्ये तयार केलेल्या आकडेवारी समोर...

दैनिक गोमन्तक

पणजी: मानवी तस्करी विरोधी कक्षाने वेश्याव्यवसाठी महिलेची मानवी तस्करी केल्याचा गुन्हा दाखल केलाअसून; या प्रकरणाचा तपास सुरु आहे. कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये पीडितेची ओळख उघड करू नये म्हणूनच पीडित महिलेच्या ओळखीचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे आरोपी व्यक्तीचे नावही घेत नाही.

(Trafficking of women for prostitution is highest in Goa )

एफआयआरनुसार, लैंगिक शोषणाच्या उद्देशाने उत्तर गोवा आणि गुजरात येथे अनेक वेळा आरोपी व्यक्तीने पीडित महिलेला दारू पाजून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दरम्यान, आरोपीने तिचा नग्न व्हिडिओ काढला असुन, तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली.

आरोपीने केवळ पीडितेवर बलात्कारच केला नाही तर फसवणूक करून सत्तेचा गैरवापर केला आहे, पीडितेला धमक्या देत तीची तस्करी केली आहे. आरोपीने पीडितेला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने आरोपीच्या हॉटेलमध्ये डांबून ठेवले. आरोपीने पीडितेचे शोषण करून पैसे मिळवले असून इतर वेळीही ते वेश्याव्यवसायाच्या कमाईवर जगतात.

आरोपीने पिडित महिलेवर अनेकवेळा बळजबरीने बलात्कार करून अनैसर्गिक संभोग केला, तसेच तिच्या शरिराचे चावे घेतले, मानसिक छळ केला, असेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. संबंधित आरोपी पोलीसांच्या रडारावर असुन त्यांना पकडण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2021 सालामध्ये तयार केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गोव्यात वेश्याव्यवसायासाठी महिलांची दरडोई मानवी तस्करी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT