Khair Tree | Dainik Gomantak
गोवा

Goa News: खैरीच्या झाडांची तस्करी; एकाला धारबांदोडात अटक

ओकांब - धारबांदोडा येथे खैरीच्या झाडांच्या तस्करीप्रकरणी वन खात्याने दोडामार्ग येथील एकाला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: ओकांब - धारबांदोडा येथे खैरीच्या झाडांच्या तस्करीप्रकरणी वन खात्याने दोडामार्ग येथील एकाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

ओकांब येथील सात खैरीच्या झाडांची कत्तल केल्याची तक्रार मिळाल्यावर वन खात्याने याप्रकरणी शोध मोहीम राबवली असता, दोडामार्ग येथील नारायण बाबू खरवत हा तोडलेल्या खैरीच्या झाडांसह सापडला.

संशयित तोडलेली खैरीची झाडे दोडामार्ग भागात नेण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी त्याचा एक साथीदार मात्र पलायन करण्यात यशस्वी ठरला.

तोडलेल्या खैरीच्या झाडांची किंमत साधारण पंचवीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली. खैरीच्या झाडांचा उपयोग विड्याच्या पानासाठी कात तयार करण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

SCROLL FOR NEXT