Mumbai Goa Highway Traffic Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Mumbai Goa Highway Traffic: महाराष्ट्रात मागील दिवसांपासून अवकाळी पावसाने धडाका लावला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांना पावसाने झोडपून काढले आहे.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway Traffic: महाराष्ट्रात मागील दिवसांपासून अवकाळी पावसाने धडाका लावला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवतहानीसह मोठ्याप्रमाणात वित्तहानीही झाली. वादळी पावसामुळे अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. यातच आता, पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे.

दरम्यान, रायगडमधील माणगावमध्ये झालेल्या वादळी पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. चाकरमान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. माणगाव रेल्वे स्टेशनजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मोठे झाडे पडले. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पथकाने तात्काळ महामार्गावरील पडलेले झाड हटवण्याचे कामही सुरु केले आहे. अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची कोंडी केली.

काही दिवसांपूर्वी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर बाहेर पडले होते. त्यावेळीही मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या लोकांचा मोठा खोळंबा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT