Cortalim Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

कुठ्ठाळीत वाहतुकीची कोंडी वाढतीच

वाहनांच्या दोन दोन रांगा; स्थानिकांसाठी डोकेदुखी वाढली

दैनिक गोमन्तक

पणजी : राष्ट्रीय महामार्ग मडगाव ते पणजी येथील महामार्ग वर कुठ्ठाळी संत्रात ते आगशीपर्यंत वाहनांच्या दोन दोन रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. दर दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर हा वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत असून त्याचा स्थानिक ग्रामस्थांना डोकेदुखी ठरू लागली आहे.

कुठ्ठाळी पाजेंतार येथील राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी थांबावे लागते वाहनांच्या गर्दीतून वाट काढत खास करून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. याठिकाणी नेहमीच वाहतूक पोलिस तैनात केला पाहिजे.वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहने संत्रात येथील अंतर्गत रस्त्यांचा अवलंब करतात. परिणामी वाहनांच्या गर्दीमुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होते.

तसेच कुठ्ठाळी खुरसाकडे येथील क्रॉसिंगसाठी जिकिरीचे झाले आहे.आगशीच्या बाजूला बगलरस्त्यापर्यंत वाहतूक संथ गतीने पुढे सरकत होती. यामध्ये भर म्हणून पर्यटक टॅक्सी चालक मध्येच आपली वाहने घुसडून वाहतूक कोंडी तर भर टाकत असतात.या एकूण वाहतूक कोंडी वर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. हा प्रकार दररोज सकाळी संध्याकाळी घडत असून आता पावसाळा सुरू झाल्यावर यात भर पडणार आहे.

कुठ्ठाळी येथील झुआरी उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असून नाहक वाहन चालकांचा वेळ वाया जातो.
कुठ्ठाळी जंक्शनकडे वास्कोकडून येणाऱ्या वाहनांची गर्दी होते. पणजीहून वास्कोकडे जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी वाहतूक पोलिस वळवत असतात. यामुळे वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकते. या एकूण प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना मात्र कसरत करावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT