Goa Margao Traffic Department  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: सहा महिन्यांत २१,९०७ प्रकरणांची नोंद; २९२ ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस

Margao Traffic Control Department: दारू पिऊन वाहन चालविण्यासंबंधित प्रकरणे वाहतूक खात्याकडे पाठविण्यात आली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगावच्या वाहतूक पोलिस विभागाने जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण २१,९०७ प्रकरणांची नोंद केली. त्यातील २९२ प्रकरणे दारू पिऊन वाहने चालविण्यासंबंधित आहेत.

ही माहिती मडगाव वाहतूक पोलिसचे पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली. दारू पिऊन वाहन चालविण्यासंबंधित प्रकरणे वाहतूक खात्याकडे पाठविण्यात आली आहेत व खात्याला चालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या उल्लंघनांची प्रकरणे खालीलप्रमाणे

गरजेपेक्षा जास्त गती - १,३६५, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे - २६०, हेल्मेट न वापरणे - १६९३, धोकादायक पार्किंग - ६५५६, नो एंट्री झोन - ६८५५, लाईट नसताना वाहन चालवणे - ६८९, झाकलेले आरसे - ७८१, सीट बेल्ट न वापरणे - १४९, नो पार्किंग झोन - ५२८, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी - १५७, सिग्नलचे उल्लंघन - ६५, बेकायदेशीर पार्किंग - ४०४, नंबर प्लेट नाही ३३५, नंबर प्लेट व्यवस्थित नाही - ६५२, मागील आरशाशिवाय वाहन - २२१, अल्पवयीनांनी व परवाना नसताना वाहन चालविणे - ३२.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT