Goa Traffic Police: हरमल हद्दीत ‘ती’ वाहने ताब्यात

Arambol Panchayat Area: बेवारस स्थितीत पार्क केलेली वाहने वाहतूक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले
Arambol Panchayat Area: बेवारस स्थितीत पार्क केलेली वाहने वाहतूक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले
read light trafficDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल येथील पंचायत हद्दीत कित्येक महिने बेवारस स्थितीत पार्क केलेली वाहने वाहतूक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.संबंधित मालकांना नोटीस बजावली आहे.

गेले कित्येक महिने कर्नाटक व महाराष्ट्र नोंदणीकृत वाहने इनोव्हा भोम पठारावर व सुमो वाहन अरुंद रस्त्यात पार्क करून ठेवले होते.त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने पार्क करून ठेवलेल्या वाहनांमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याने नागरिकांनी माहिती दिली होती.

ही वाहने वाहतुकीला अडसर ठरत असल्याचे स्थानिकांनी पेडणे वाहतूक विभागाचे निरीक्षक विश्‍वजित चोडणकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. अवघ्या काही दिवसात हालचाल करून संबधित राज्यात वाहतूक विभागाशी संपर्क साधून मालकांना नोटीस बजावली व मुदतीत न हलविण्यास पोलिसांच्या ताब्यात दिली जातील, असे कळविले.

त्यानुसार दोन्ही वाहने पोलिस स्थानकात नेऊन ठेवल्याने नागरिकांनी वाहतूक विभागाचे निरीक्षक विश्‍वजित चोडणकर यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून कारवाई केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Arambol Panchayat Area: बेवारस स्थितीत पार्क केलेली वाहने वाहतूक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले
Goa Traffic Police: म्हापसा वाहतूक पोलिसांकडून ६५ लाखांचा दंड वसूल

‘त्या’ कारचे अवशेष रस्त्यालगत

गेल्या पर्यटन हंगामात तसेच नववर्षात हरमल किनारी भागातील वाहतूक कोंडी व अन्य बाबतीत वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास वाहतूक विभागाचे निरीक्षक विश्‍वजित चोडणकर यांनी प्राधान्य दिल्याने,त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.गेल्यावर्षी अन्य एका वाहनास आग लागली होती.त्या कारचे अवशेष अद्यापही रस्त्यालगत पडून आहेत.वास्तविक मालकाने सोपस्कार केले,मात्र वाहन त्याच स्थितीत सोडून आपल्या गावी केल्याचे समजते.त्यामुळे संबधित खात्याने याबाबतीत जलद पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com