Vasco Shipyard Company Dainik Gomantak
गोवा

Vasco: बेकायदा वाहन पार्किंगवर पोलिसांची धडक कारवाई

पुन्हा दुचाकी पार्क केल्यास वाहतुक परवाना करणार रद्द

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को गोवा शिपयार्ड कंपनीसमोर कंपनीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन पार्क करून वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे वाहतुक पोलिसांच्या नजरेस आलेे. यामूळे वाहतुक पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा शिपयार्ड कंपनीच्या सर्व दुचाकी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली.

(Traffic Police action on vasco Goa Shipyard company illegal vehicle parking)

गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहने गोवा शिपयार्ड समोरील बसस्थानकासमोर पार्क करतात आणि समोर असलेल्या गोवा शिपयार्ड आस्थापनात कामाला जातात. यामुळे नवेवाडे, वाडे भागातील नागरीकांना खाजगी बसमधून वास्कोकडे जाताना अडथळा निर्माण होतो. यामुळे रस्त्यावर उभे राहून खाजगी बसची वाट पाहावी लागते.

रस्त्यावर उभे राहील्याने भविष्यात प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी प्रवाशांनी प्रसार माध्यमांचे तसेच वास्को वाहतुक पोलिसांचे बेकायदेशीर वाहन पार्ककडे लक्ष वेधले.

दरम्यान वास्को वाहतुक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्याकडे याबाबत तक्रार येताच, गोवा शिपयार्ड कंपनीने बसस्थानकासमोरील बेशिस्त वाहने पार्क करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच काही दुचाकी वाहन चालक नसल्याने त्यांची वाहने टोईंग करून वास्को पोलिस स्थानकावर आणून ठेवली.

यापुढे एकही दुचाकी वाहन गोवा शिपयार्ड बसस्थाकासमोर पार्क केल्यास दुचाकी वाहनचालकावर कडक कारवाई करून त्याचा वाहतुक परवाना ताब्यात घेतला जाईल. यासाठी गोवा शिपयार्ड कंपनीत कामासाठी वाहने योग्य ठिकाणी पार्क करावी. असे आवाहन वास्को वाहतुक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT