Gandhi Jayanti: गोव्यात गांधी जयंतीला कसिनो, बार राहणार बंद

राज्यात सर्व बार, किरकोळ मद्यविक्री, रेस्टॉरंट्स राहणार बंद
Casinos in Goa| Deltin casino news
Casinos in Goa| Deltin casino news Dainik Gomantak

गांधी जयंतीनिमित्त रविवारी राज्यातील सर्व कसिनो गेमिंग तसेच सर्व बार, किरकोळ मद्यविक्री, रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा निर्णय गोवा प्रशासनाने घेतला आहे. हा आदेश शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत लागू असेल.

(Goa Casinos bars to remain shut on Gandhi Jayanti)

Casinos in Goa| Deltin casino news
Goa Rain: येत्या काही तासांत राज्यात वादळासह हलक्या पावसाची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार गोवा प्रशासनाने गांधी जयंतीनिमित्त राज्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत निर्णय दिला असून मिळालेल्या माहितीनुसार गांधी जयंतीनिमित्त म्हणजेच 2 आक्टोबर मद्यविक्री बंद असेल असे म्हटले आहे.

Casinos in Goa| Deltin casino news
Goa Mining : गुपचूप हालचाली करण्यामागचे गौडबंगाल काय?

याबाबत ( गृह ) सचिव विवेक नाईक यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, कसिनो परवानाधारकांना शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्रीत कामकाज थांबवावे लागेल. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री पुन्हा व्यवसाय सुरू करावा लागेल. असाच आदेश मद्य परवानाधारकांसाठी लागू असेल

एका उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व परवानाधारकांना रविवारी बंद करावे लागेल आणि शनिवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होईल. “मद्यविक्री रविवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतील. नाईक म्हणाले वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे सक्तीचे आहे. याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे.

यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथके तयार आहेत. याबाबतीतील उल्लंघनाच्या कोणत्याही तक्रारीची नोंद करण्यासाठी सर्व स्थानके सतर्क आहेत. आक्षेपार्हबाबींची माहिती दिल्यास तातडीने कारवाई केली जाईल असे ही त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com