Guleli Grampanchayat Pothole Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: बाप रे! गुळेली -मुरमुणे मेळावली मोठा खड्डा; स्थानिकांनी मांडला वेगळाच तर्क

Guleli Grampanchayat: पर्यायी रस्त्यावरून सावधपणे वाहने हाकण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रात गुळेलीहून -मुरमुणे मेळावली भागात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर म्हारवाडा-मुरमुणे येथे मोठा खड्डा पडला असून सदर खड्ड्याची व्याप्ती जवळच असलेल्या रगाडा नदीपर्यंत आहे. म्हणजे या खड्ड्यात पडलेले पाणी नदीपर्यंत पोचते.

रस्त्याच्या मधोमध भुयारासारखा खड्डा असावा, असा तर्क स्थानिक व्यक्त करीत आहेत. तयार करण्यात आलेल्या पर्यायी कच्च्या रस्त्यावरून सावधपणे वाहने हाकावी, असे आवाहन पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

सरपंच नितेश गावडे व पंच सदस्य सिध्दू गावकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर वाळपई पोलिसांना कळवून त्यांच्या मदतीने बॅरिकेड घालून रस्ता अडविण्यात आला. काल रात्रभर त्या मार्गातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ नये, यासाठी रस्ता बंद करण्यात आला.

गावडे म्हणाले, पोलिसांनी सुध्दा तातडीने येथे येऊन रस्ता बंद केला. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. त्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना कळविल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

त्यामुळे आज सोमवारी सकाळपासून अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून हा भुयारासारखा खड्डा कसा पडला, याची चौकशी केली. डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे जमिनीखालून मोठे भुयार तयार झाले होते. रस्त्याच्या खाली भुयार असल्यामुळे रस्ता मध्येच खचला आणि धोकादायक खड्डा पडला.

पंच सिद्धू गावकर म्हणाले, मेळावली भागातील मुरमुणे, पैकुळ, शेळ ,मैगीणे, धडा आदी भागातील लोकांना हा मार्ग बंद झाला तर गवाणे - खोतोडा, किंवा बोंडलामार्गे गुळेली गाठावी लागणार आहे. तो पल्ला लांबचा आहे.

त्यामुळे हा रस्ता सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. या मार्गावर कलवट आणि संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे. यासंबंधीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मांडून ठराव संमत करून याची फाईल सरकार दरबारी आहे. त्यामुळे सरकारने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून रस्ता सुरळीत करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT